भारताने हा सामना जिंकत विजय खेचत आणला आहे. ऑस्ट्रेलियावर 4 गडी राखत भारताने विजय मिळवला आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील पहिल्या सेमी फायनलमध्ये टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने आले होते. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. टीम इंडियाने साखळी फेरीतील तिनही सामने जिंकले आहेत. तर ऑस्ट्रेलियाने 1 सामना जिंकला. तर 2 सामने पावसामुळे रद्द झाल्याने 1-1 असे एकूण 2 गुण मिळाले आणि कांगारु उपांत्य फेरीत पोहचले. आता भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम फेरीत पोहचण्यासाठी चांगली चुरस पाहायला मिळाली.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी निवडली. त्यामुळे आता भारताला कमी धावांवर रोखण्याचं आव्हान मिळालं. यावेळी ऑस्ट्रेलियाने 265 धावांचे आव्हान भारतासमोर ठेवले. कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल ही जोडी मैदानात उतरली. रोहित शर्माने पहिल्याच चेंडूवर चौकार मारून सामन्याला सुरुवात केली. दरम्यान भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीने दमदार खेळी करत भारताच्या धावांमध्ये मोठी मदत केली. मात 82 धावांवर विराट आऊट झाला.