25 वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जेतेपदाच्या सामन्यात भारत-न्यूझीलंड संघ पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. आज भारत आणि न्यूझीलंड संघात चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना होणार आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025ची फायनल आज दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.
हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता सुरू होईल. त्याचा टॉस अर्धा तास आधी दुपारी 2:00 वाजता होईल. आता भारत विरुद्ध न्यूझीलंड संघ चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा अंतिम सामना खेळणार असून चॅम्पियन्स ट्रॉफीचा मानकरी कोण ठरणार याकडे संपूर्ण क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
अस असताना आता टीम इंडियाला अंतिम सामना होण्याआधीच मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा स्टार प्लेअर आणि किंग म्हणून ज्याला ओळखल जात असा टीम इंडियाचा किंग कोहली गंभीर जखमी झाला आहे. सराव करत असताना विराट कोहलीच्या गुडघ्यावर नेट्समध्ये एक चेंडू येऊन जोरात आदळला.
यामुळे विराट कोहलीला गंभीर दुखापत झाली असून त्याच्या गुडघ्याला जोरदार वेदना झाल्या आहेत ज्यामुळे विराटची वाईट अवस्था झाली आहे. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्याला अवघे काही तास उरले आहेत. अशातच टीम इंडिया आणि चाहत्यांसाठी ही वाईट बातमी समोर आली आहे.