भारतीय क्रिकेट संघातील प्रसिद्ध फिरकीपटू अमित मिश्रा याच्यावर पत्नी गरिमा मिश्रा यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. शनिवारी गरिमाने पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार नोंदवली.तक्रारीनुसार, मिश्रा आणि त्याच्या कुटुंबीयांनी हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक त्रास दिला. तसेच, अमित मिश्राचे इतर महिलांशी विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोपही गरिमाने केला आहे. या प्रकारामुळे त्या दीर्घकाळ त्रस्त असल्याचे तक्रारीमध्ये नमूद केले आहे.
या प्रकाराची पोलीस चौकशी सुरु असून, अमित मिश्राने अद्याप यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र माध्यमांपुढे हे सर्व आरोप खोटे असल्याचे सांगितले असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा क्रिकेटपटूंच्या वैयक्तिक आयुष्याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. या संदर्भात अधिक तपशील पोलीस तपासानंतर पुढे येतील.
याआधीही अमित मिश्रा वादाच्या भोवऱ्यात :
2015 मध्ये अमित मिश्रावर बेंगळुरूमधील हॉटेलमध्ये मैत्रीण वंदना जैनसोबत वाद झाल्याचे आरोप झाले होते. वंदना जैनने मिश्रा विरोधात मारहाणीचा आरोप केला होता आणि पोलिसांनी एफआयआर दाखल केली. अमित मिश्राने या आरोपांना खोटे ठरवले होते आणि ते जामिनावर सुटले. हे प्रकरण वैयक्तिक वादावर आधारित होते आणि या प्रकरणाचा क्रिकेट कारकिर्दीवर फारसा परिणाम झाला नव्हता. अमित मिश्रावर स्वतःच्या बायकोनेच आता आरोप केल्याने पुन्हा एकदा क्रिकेटपटू वादाच्या भवऱ्यात सापडले आहेत.