क्रिकेट

Yash Dayal : करिअरच आमिष, ब्लॅकमेलिंग अन्... यश दयालवर IPL दरम्यान दोन वर्ष लैंगिक अत्याचाराचा आरोप

क्रिकेटर यश दयालवर आणखी एका अल्पवयीन मुलीने तब्बल दोन वर्ष लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे.

Published by : Prachi Nate

IPL 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील वेगवान गोलंदाज यश दयाल सध्या मोठ्या अडचणीत सापडला आहे. एका महिलेने त्याच्यावर लग्नाचं आमिष दाखवून मानसिक, शारीरिक आणि आर्थिक शोषण केल्याचा गंभीर आरोप केला होता. ज्यासंबंधीत त्या महिलेने यश दयालसोबतचे व्हॉट्सॲप चॅटचे स्क्रिनशॉट, व्हिडिओ कॉल आणि फोटो पोलिसांना दिले आहेत.

ज्यामुळे त्याच्यावरचे आरोप सिद्ध होण्याची दाट शक्यता दर्शवली जात होती. त्याच्यावरचा आरोप सिद्ध झाला तर त्याला भारतीय न्याय संहितेच्या कलम 69 अंतर्गत यशला किमान 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते. अशातच त्याच्यावर आणखी एका अल्पवयीन मुलीने तब्बल दोन वर्ष लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. आयपीएल क्रिकेटपटू यश दयालचे नाव दुसऱ्या एफआयआरमध्ये आले आहे.

जयपूरच्या एका हॉटेलमध्ये 17 वर्षीय पीडित मुलीवर बलात्कार केल्याचा दावा त्याचावर करण्यात आला आहे. यश दयाल IPL दरम्यान जयपूरमध्ये असताना तिला क्रिकेटमध्ये करिअर घडवण्याच आमिष देत तिला ब्लॅकमेल करत तिच्यावर दोन वर्ष लैगिंक अत्याचार केला असल्याचा दावा पीडित मुलीने केला आहे. दरम्यान जयपूरमधील सांगानेर पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून याविषयी चौकशी सुरु आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : सोलापुरात बंजारा समाजाचा मोर्चा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरती प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; आज विशेष ब्लॉक, 'या' वेळेत राहणार वाहतूक बंद?

New Delhi : सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचे निधन

Amol Mitkari : प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते...; अंजली दमानियांच्या पतीची सरकारी संस्थेवर नियुक्ती, अमोल मिटकरींचा दमानियांना टोला