काल दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सामना रंगला. यामध्ये काल दिल्ली कॅपिट्ल्सने विजय मिळवून आयपीएलच्या 18 व्या सिझनमध्ये आपलं खात उघडलं आहे. अशातच केएल राहुलला 24 एप्रिलला कन्यारत्न प्राप्त झालं आहे. त्यामुळे तो आयपीएल 2025 स्पर्धेतील पहिल्या सामन्यातून बाहेर होता. काल लखनऊ विरुद्धचा सामना दिल्लीने जिंकला होता, अशातच के.एल. राहुलने गोड बातमी चाहत्यांना दिली. राहुल आणि त्याची पत्नी आथिया शेट्टी यांच्या घरी पाळणा हलला आहे. आथियाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे
या दणदणीतनंतर दिल्ली कॅपिटल्सचा संघ त्यांच्या ड्रेसिंग रुममध्ये गेला. त्यावेळी खेळाडूंनी तसेच सपोर्ट स्टाफ आणि कोचिंग स्टाफमधील सदस्यांनी मिळून एक गोड व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमधून दिल्ली कॅपिटल्स संघाने केएल राहुलला कन्यारत्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडिओला कॅप्शन देत त्यांनी लिहिले की, आमचे कुटुंब वाढले, आमचे कुटुंब साजरे करते" असं कॅप्शन दिलं आहे, तर यावर केएल राहुल कमेंट केले आहे ज्यात, "हे आमच्यासाठी खूप अर्थपूर्ण आहे, लाख लाख धन्यवाद", असं म्हणत संघाचे धन्यवाद मानले आहेत.