काल चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचा अंतिम सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियाला 252 धावांचे आव्हान दिलं होत जो टीम इंडियाने 254 धावांसह पार पाडत पराभूत केल. यामध्ये सर्व खेळाडूंची पराक्रमी खेळी पाहायला मिळाली. याचपार्श्वभूमिवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीम इंडियाचे कौतूक केलं आहे.