भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल सध्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत असलेला पाहायला मिळत आहे. धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहल याचा घटस्फोट झाला. त्यानंतर धनश्री वर्माने चहलसोबतचे फोटो सोशल मीडियावरुन काढून टाकले होते. रविवारी झालेल्या चॅम्पियन ट्रॉफी 2025 च्या सामन्यात चहल एका मुलीसोबत कॅमेऱ्यात कैद झाला. चहल आरजे महवशसोबत सामना पाहायला आला होता. याचदरम्यान चहलची पुर्वआश्रमीची पत्नी धनश्रीने घटस्फोटबद्दलच मौन सोडले. घटस्फोटावेळी धनश्रीला जबाबदार ठरवण्यात आले. यासाठी धनश्री अधिक प्रमाणात ट्रोल केले गेले. घटस्फोटांच्या चर्चेंना धनश्रीने आजपर्यंत आपली प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र आता धनश्रीने सोशल मीडियावर स्टोरी टाकत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
धनश्रीने पोस्टमध्ये काय लिहिले,
धनश्रीने इंन्टाग्रामवर स्टोरी शेअर करत प्रतिक्रिया दिली. या पोस्टमध्ये धनश्रीने लिहिले की, " महिलांना दोष देणे ही एक फॅशन बनली आहे". स्टोरी पोस्ट करत धनश्रीने चहलसोबतचे फोटो पुन्हा रिस्टोर केल्याने आता चर्चेना उधाण आले.
युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माच्या नात्याबद्दल बोलायचे झाले तर, ते दोघं अनेक वर्षांपासून डेट करत होते. त्यानंतर दोघेही लग्नबंधनात अडकले. मात्र त्याच्यामध्ये मतभेद झाले. त्याने २१ फेब्रुवारी 2025 रोजी दोघांचा घटस्फोट झाला आहे.