आयपीएल 2025 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने शेवटच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव करून हंगामाचा निरोप घेतला. पॉईंट्स टेबलवर शेवटच्या स्थानावर असणाऱ्या चेन्नईच्या संघाने टेबल टॉपर्स गुजरात टायटन्सचा पराभव केला आहे. त्यामुळे गुजरातचे गुण घसरले आहेत. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने गुजरातला 230 धावांचे आव्हान दिलं होते. जे पुर्ण करत असताना गुजरातने 147 धावांसह सामना गमावला. धोनीबाबत अनेक वर्षांपासून त्याच्या निवृत्तीच्या चर्चा सुरु होतात. या साखळी सामन्या दरम्यान धोनी असा प्रश्न विचारला गेला की तु पुढील सामने खेळणार का? तुला पिवळ्या जर्सीत शेवटचं पाहतोय का?
यावर धोनीने म्हटलं की, "आयपीएल 2026 ला अजून बराच कालावधी आहे. मी निवृत्ती घ्यायची की, नाही हे त्यावेळेसच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. हा निर्णय घेण्यासाठी अजून बराच कालावधी आहे. त्यामुळे कसलीच घाई नाही. तुम्हाला सर्वोत्तम कामगिरीसाठी तयार असायला हवं. त्यामुळे मी सध्या माझं शरीर तंदुरुस्त ठेवण्यावर लक्ष देत आहे. जर क्रिकेटपटू त्यांच्या कामगिरीवरून निवृत्ती घ्यायला लागले, तर अनेक असे खेळाडू आहेत ज्यांना वयाच्या 22 व्या वर्षीच निवृत्ती घ्यावी लागेल. मी निवृत्त होतोय असे मी म्हणणार नाही, किंवा पुन्हा येईल असही सांगू शकत नाही. मी आता रांचीला जाणार आहे आणि बाईक चालवण्याचा आनंद घेणार आहे. मी याबाबत विचार करुन नंतर निर्णय घेईन".