31 ऑगस्टपासून लंडनमधील केनिंग्टन ओव्हल येथे इंग्लंड दौऱ्याच्या शेवटच्या आणि अंतिम कसोटीला म्हणजेच पाचव्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. नुकताच चौथ्या कसोटीतील शेवटचा सामना मँचेस्टरमध्ये खेळवण्यात आला, हा सामना रविवारी ड्रॉ झाला. ज्यामुळे इंग्लंड दौऱ्यादरम्यान या कसोटी सामन्यात चार सामने पार पडले असून सध्याची स्थिती 2-1 अशी आहे. जर टीम इंडियाने पाचवा कसोटी सामना जिंकला तर ही मालिका ड्रॉ होईल.
त्याचसोबत जर इंग्लंडने हा सामना जिंकला तर 3-1 ने इंग्लंड ही मालिका जिंकतील. त्यामुळे भारतासमोर 'करो या मरो'ची स्थिती निर्माण झाली असून भारताला कोणत्याही परिस्थितीत पाचवा सामना जिंकावाच लागणार आहे. पाचवा सामना सुरु होण्याआधीच टीम इंडियाचा उपकर्णधार ऋषभ पंत याला कसोटी सामन्यातून बाहेर पडाव लागलं.
त्याचसोबत इंग्लंडला देखील मोठा धक्का बसला, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याच्या खांद्याला दुखापत झाल्यामुळे त्याला देखील पाचव्या कसोटी सामन्यातून बाहेर पडाव लागले. अशातच इंग्लंड संघाच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्स हा देखील पाचव्या कसोटीतून बाहेर पडणार आहे.
झालं असं की, पाचव्या कसोटीतील पहिल्या दिवशी करुन नायरने मारलेला फटका बाउंड्री लाईनवर अडवताना ख्रिस वोक्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे आदळला ज्यामुळे त्याला दुखापत झाली. यावेळी त्याच्या खांद्याला जोरात दुखापत झाल्याने तो वेदनेने कळवळत असलेला पाहायला मिळाला. ज्यामुळे क्षणार्धात त्याला पाचव्या कसोटीतील उर्वरित सामन्यातून माघार घ्यावी लागली आहे.