इंग्लंड दौऱ्यादरम्यान कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा यॉर्करकिंग म्हणून ओळखला जाणारा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने तीन महत्त्वाच्या विकेट घेतल्या. इंग्लंड दौऱ्यादरम्यान कसोटी सामन्यात पहिला दिवस टीम इंडियाच्या फलंदाजांनी गाजवलेला पाहायला मिळाला. तर दुसऱ्या दिवशी इंग्लंडने 3 विकेट गमावून 209 धावा करत कमबॅक केला आहे.
दुसऱ्या दिवशी सुरुवातीला इंग्लंडला टीम इंडियाचा गोलंदाज जसप्रीत बुमराहने आपल्या अचूक गोलंदाजीसह गार केले होते. मात्र इंग्लंडकडून बेन डकेट आणि ओली पोपने यांनी संघ सावरला. तर दुसरीकडे टीम इंडियाने 41 धावांच्या आत 7 विकेट्स गमावल्या. यावेळी इंग्लंडकडून स्टोक्स आणि टंगने दोघांनी प्रत्येकी 4 विकेट घेतल्या. टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध पहिल्या डावात 471 धावा केल्या.
यावेळी बुमराहच्या गोलंदाजीचा कहर पाहायला मिळाला. त्याने पहिल्याच ओव्हरमध्ये झॅक क्रॉली अवघ्या 4 धावांवर माघारी परतवलं. बेन डकेट आणि ऑली पोप यांच्यानंतर 28 व्या ओव्हरमध्ये बुमराहने टीम इंडियाला ब्रेकथ्रू दिला आणि डकेटला 62 धावांवर बाद केले. यावेळी बुमराहने टीम इंडियासाठी तिन्ही विकेट घेतल्या.