आज आयपीएल 2025 स्पर्धेचा महाअंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु आहे. यावेळी पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे आरसीबीने फलंदाजी करत पंजाबला 191 धावांच आव्हान दिलं आहे. यादरम्यान सॉल्ट 16 धावांवर बाद झाला, त्याला अय्यरने शानदार कॅच पकडत बाद केले. सॉल्टची पहिली विकेट गेल्याबरोबर आरसीबीला पहिला धक्का बसला.
त्यानंतर कोहली-पाटीदारच्या जोडीने 10 ओव्हरमध्ये 87 धावांचा पल्ला गाढला. अखेर 15 व्या ओव्हरमध्ये अझमत उमरझाई गोलंदाजीवर विराट कोहलीने पुलशॉट मारण्याचा प्रयत्न केला आणि उमरझाई चपळाई पुढे धावत जात विराटला झेल घेत बाद केले. तो 35 बॉलमध्ये 3 चौकारांसह 43 धावा करत माघारी परतला. मात्र यावेळेस विराटला आपला अर्धशतक देखील पुर्ण करता आला नाही. यामुळे आरसीबीला मोठा धक्का बसला आहे. यादरम्यान 12 ओव्हरमध्ये आरसीबीने 100 पार केले.
यापुर्वी आरसीबीकडून मयंक अग्रवाल 24 धावांसह बाद झाला, तर कर्णधार रजत पाटीदार 26 धावांसह लेग बाय आऊट झाला. लियाम स्टीवन लिविंगस्टोन 25 धावांसह बाद झाला. जितेश शर्मा 24 धावांसह बाद तर पुढे रोमारियो शेफर्ड 17 धावांसह आऊट झाला. तर दुसरीकडे पंजाबकडून आक्रमक गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. पंजाबच्या गोलंदाजांकडून अर्शदीप सिंग आणि काईल जेमीसन यांनी प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या. अझमातुल्लाह ओमरझाई, विजयकुमार वैशक आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 1-1-1 अशा विकेट घेतल्या.