क्रिकेट

Virat Kohli : "तू त्याच्याशी लग्न कर" ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटरचा लेकीला सल्ला

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मार्क टेलर याने एका पॉडकास्टमध्ये खुलासा केला की त्याने आपल्या मुलीला विराटसोबत लग्न करण्याचा सल्ला दिला.

Published by : Prachi Nate

टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली याचा चाहतावर्ग जगभरात आहे. त्याची फॅशन, खेळातील आक्रमकता आणि व्यक्तिमत्त्व लाखोंना भुरळ घालते. पण विराटच्या चाहत्यांमध्ये केवळ सामान्य लोकच नाहीत, तर अनेक दिग्गज क्रिकेटपटूही त्याच्यावर फिदा आहेत. याचाच एक भन्नाट किस्सा नुकताच उघडकीस आला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मार्क टेलर याने एका पॉडकास्टमध्ये खुलासा केला की तो विराट कोहलीच्या व्यक्तिमत्त्वाने एवढा प्रभावित झाला होता की त्याने थेट आपल्या 17 वर्षांच्या मुलीला विराटशी लग्न करण्याचा सल्ला दिला होता.

ही मजेशीर माहिती एलिसा हिलीच्या ‘Willow Talk’ पॉडकास्टमध्ये उघड झाली. टेलरने 2014 मध्ये कोहलीला दिलेल्या मुलाखतीचा एक किस्सा शेअर करत सांगितलं की, “मुलाखत सुरू असताना कोहलीला टीम मॅनेजरने परत बोलावलं, पण कोहलीने ठामपणे सांगितलं की,‘मी आधी ही मुलाखत पूर्ण करेन.’त्याचा तो व्यावसायिकपणा आणि आदर पाहून मी थक्क झालो.” त्याच वेळेस टेलरने आपल्या मुलीला कोहलीशी ओळख करून दिली आणि विनोद करत म्हणाला, "तो छान मुलगा आहे, तुला वाटलं तर त्याच्याशी लग्न कर!" त्यावेळी विराटचं अनुष्काशी नातं सुरू झालेलं नव्हतं.

आज विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे देशातील सर्वात चर्चेतील सेलिब्रिटी कपल आहेत. त्यांना एक मुलगी वामिका (2021) आणि एक मुलगा अकाय (2024) आहे. मार्क टेलरचा हा किस्सा जितका मजेदार, तितकाच विराटच्या जगभरातील प्रभावाची साक्ष देणारा आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope |'या' राशीच्या व्यक्तींना अचानक होऊ शकतो धनलाभ, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Aajcha Suvichar : आजचा सुविचार

Shrimant Yuvraj Sambhajiraje Bhosale : 'अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदे'च्या प्रदेशाध्यक्षपदी श्रीमंत युवराज संभाजीराजे भोसले यांची निवड

Chhatrapati Sambhajinagar : 35 वर्षांनंतर धक्का! PSI गफ्फार खान यांचे जात प्रमाणपत्र रद्द; पुढील वर्षी निवृत्तीपूर्वीच मोठा निर्णय