सध्या क्रिकेट या क्षेत्रातून अनेक संघाच्या खेळाडूंच्या बातम्या कानावर पडतात. भारतीय संघातील खेळाडूनच्या घटस्फोटापासून ते त्यांच्या लग्नबंधनाच्या तसेच कोणत्या खेळाडूबद्दल वादग्रस्त गोष्टी अशा अनेक बातम्या खेळाडूंच्या समोर येत आहेत. नुकताच चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. क्रिकेटमधील सर्वात दणकट संघ म्हणून ओळखला जाणारा संघ हा ऑस्ट्रेलिया संघ आहे.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे खेळाडू आणि त्यांची उत्कृष्ट कामगिरी यांची कायम चर्चा होत असते. त्याचसोबत ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे खेळाडू मोठ्या वादाच्या भोवऱ्यात देखील अडकतात. अशातच आत ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज स्टुअर्ट मॅकगिल याला 13 मार्च म्हणजे आज कोकेन तस्करीत सहभागी असल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले आहे. परंतु मोठ्या प्रमाणात ड्रग्ज पुरवठ्यात सहभागी असल्याबद्दल त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
एप्रिल 2021 मध्ये सिडनी जिल्हा न्यायालयाच्या ज्युरीने 54 वर्षीय लेग-स्पिनरला 330000 ऑस्ट्रेलियन डॉलर्समध्ये 1.81 कोटी रुपयांच्या एक किलोग्राम कोकेनची डील केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्त केले. तथापि, त्याला ड्रग्ज पुरवठ्यात सहभागी झाल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आले आहे. त्याच्या कारकिर्दीला लागलेल्या या डागामुळे क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे.