क्रिकेट

Dilip Doshi Passes Away : माजी भारतीय फिरकीपटू दिलीप दोषी यांचे निधन

कसोटी क्रिकेटमधील दिग्गज फिरकीपटू दिलीप दोषी यांचे लंडनमध्ये निधन

Published by : Team Lokshahi

भारतीय संघाचे माजी डावखुरे फिरकीपटू दिलीप दोषी यांचे लंडनमध्ये निधन झाले. त्यांच्या निधनावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शोक व्यक्त केला आहे. “भारताचे माजी फिरकीपटू दिलीप दोषी यांच्या निधनामुळे आम्ही शोकाकुल आहोत. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो,” असे BCCI ने अधिकृत ‘X’ हँडलवर लिहिले.

भारत व इंग्लंडमधील कसोटी सामन्यात समालोचन करताना नवज्योत सिंग सिद्धू यांनी दोषी यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी दोषी व जावेद मियांदाद यांच्यातील ड्रेसिंग रूममधील किस्सा सांगितला.

22 डिसेंबर 1947 रोजी जन्मलेले दिलीप दोषी हे उशिरा, वयाच्या 30व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दाखल झाले. तरीही त्यांनी केवळ 33 कसोटीत 114 बळी मिळवत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. 1979 ते 1983 दरम्यान त्यांनी 14 एकदिवसीय सामन्यांत 22 बळी घेतले. त्यांच्या कसोटी पदार्पणातच त्यांनी चेन्नईत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 8 बळी मिळवले होते.

ते सौराष्ट्र, बंगालसह इंग्लंडमधील नॉटिंगहॅमशायर व वॉरविकशायर या संघांसाठी खेळले. त्यांच्या पहिल्या श्रेणी क्रिकेटमधील 898 बळी हा त्यांचा दैदिप्यमान वारसा ठरतो. त्यांच्या निधनाने एक गुणवान क्रिकेटपटू हरपला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा