क्रिकेट

Shubman Gill Century : गिलने पुन्हा जिंकली भारतीयांची मनं! शतक पूर्ण करत बांगलादेशचा दारुण पराभव

शुभमन गिलच्या शानदार शतकाने भारताने बांगलादेशचा 6 गडी राखून पराभव केला. गिलच्या दमदार खेळीने भारतीय चाहत्यांचे मन जिंकले.

Published by : Prachi Nate

हायब्रिड मॉडेलच्या आधारे आंततराष्‍ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) या चॅम्पियन्स ट्रॉफी स्‍पर्धेचे आयोजन केले असून दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारतविरुद्ध बांगलादेश या संघांमध्ये सामना पार पडला. या सामन्यादरम्यान बांगलादेश या संघाने नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि टीम इंडियासमोर 229 धावांचे आव्हान ठेवले होते.

या धावा पुर्ण करण्यासाठी सुरुवातीला मैदानात हिटमॅन आणि गिल या जोडीने 69 धावांची भागीदारी करत दमदार सुरुवात करुन दिली. त्यानंतर रोहित फार काळ न टिकता 41 धावांवर माघारी परतला. मात्र, गिलने शेवटपर्यंत रोमांचक असा डाव खेळला. त्यानंतर विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल या स्टार खेळाडूंनी गिलला साथ दिली.

त्यानंतर अखेर के एल राहुलसह मिळून गिलने कुठेही डगमगता शेवटपर्यंत किल्ला लढवला. त्याने त्याचे शानदार शतक पुर्ण करत टीम इंडियाचे 6 गडी राखून विजय मिळवून दिला. ज्यामुळे गिलने पुन्हा एकदा कोट्यवधी भारतीयांचं मन जिंकलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : "कोण जैन लोक आहेत जी...", फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालासह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू