ग्लेन मॅक्सवेलने टी-20 मध्ये एक मोठा तिहेरी विक्रम स्वतःच्या नावावर प्रस्थापित केला. ग्लेन मॅक्सवेलने मेजर लीग क्रिकेटमध्ये वॉशिंग्टन फ्रीडम विरुद्ध लॉस एंजेलिस नाइट रायडर्स यांच्यात खेळताना हा विक्रम केला. मेजर लीग क्रिकेटमध्ये लॉस एंजलिस नाईट रायडर्सच्या गोलंदाजीवर धावांचा पाऊस पाडत त्यांनी टी-20 मधील आठवे शतक पूर्ण केले. या विक्रमी शतकासह मॅक्सवेलने सर्वाधिक 20-20 शतकांच्या यादीमध्ये रोहित शर्माच्या विक्रमाशी बरोबरी केलेली आहे.
त्याने पहिल्या चेंडूमध्ये तब्बल 10 धावा केल्या आणि हळूहळू त्याने धावांचा वेग वाढवत फक्त 48 बॉल मध्ये शतक पूर्ण केले. 2 चौकार 13 षटकारासह त्याने टी-20 क्रिकेट मध्ये 10,500 धावांचा टप्पा पूर्ण केला, असून त्याच्या नावावर 20-20 क्रिकेटमध्ये 178 विकेटचा ही रेकॉर्ड आहे. क्रिकेटमध्ये दहा हजाराहून अधिक धावा आणि 150 हून अधिक विकेट्स आणि एका पेक्षा जास्त शतक असे तिहेरी विक्रमाची नोंद करणारा हा जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे.
याआधी कॅरॉन पोलार्ड आणि शोहेब मलिक यांनी 10 हजाराहून अधिक धावा आणि 150 हून अधिक विकेट असा दुहेरी विक्रम केला आहे. यावेळी मॅक्सवेलचे कुटुंब हा अविस्मरणीय सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होते. त्याने त्यांच्यासमोर अत्यंत उत्कृष्ट खेळी करत आपले विक्रमी शतक पूर्ण केले. "मी सुरुवात खूप हळू केली मात्र नंतर माझी बॅटिंग खूप चांगली झाली आणि मी सामना शेवटपर्यंत घेऊन जाऊ शकलो" या शब्दात ग्लेन मॅक्सवेलने आपल्या भावना व्यक्त केल्या. या शतकासह मॅक्सवेलने सर्वाधिक 20-20 शतकांच्या यादीमध्ये रोहित शर्माच्या विक्रमाशी बरोबरी केलेली आहे.
यापूर्वी, कोणत्याही फलंदाजाला टी20 क्रिकेटमध्ये हे तिहेरी यश मिळाले नव्हते. त्या खेळीसोबतच, त्याने वनडेत द्विशतक करणारा ऑस्ट्रेलियाचा पहिला आणि एकूण नववा फलंदाज होण्याचा मान मिळवला, तसेच विश्वचषकात शतक करणारा तिसरा फलंदाज ठरला. अलीकडेच, त्याने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, पण टी20 क्रिकेटमध्ये तो खेळणे सुरू ठेवणार आहे.