आज कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स या संघांचा सामना महाराजा यादविंद्र सिंग इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यादरम्यान पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे कोलकाताला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली.
मात्र, घरच्या मैदानात सामना असून देखील पंजाबचा कोलकाताच्या गोलंदाजांसमोर ठावठिकाणा राहिला नाही. पंजाब अवघ्या 15.3 ओव्हर्समध्ये ऑल आऊट झाला असून त्यांनी फक्त 111 धावा करत केवळ 112 धावांच आव्हान कोलकाताला दिलं आहे. पंजाबच्या सलामीवीरांना सोडल्यास संघातले इतर सर्व फलंदाज अपयशी ठरले. त्यामुळे पंजाबच्या पहिल्या धमाकेदार सुरुवाती नंतर संपुर्ण संघ ढासळून गेला आहे. तर कोलकाताला विजयासाठी 112 धावा करायच्या आहेत.
'या' खेळाडूने वाढवली पंजाबची डोकेदुखी
तर दुसरीकडे पंजाबची एवढी वाईट फलंदाजी पाहता प्रीति झिंटाची डोकेदुखी वाढवताना पाहायला मिळत आहे. त्यात पंजाबचा एक फलंदाज असा आहे की ज्याला प्रत्येक वेळेस संधी देऊन देखील त्याच्या पदरी अपयशचं मिळतो आहे. पंजाबने 4.2 कोटींना ग्लेन मॅक्सवेलला आपल्या संघात करारबद्ध केलं होत. तर आज संघाला त्याची खरी गरज असताना देखील तो माघारी फिरला.
पंजाबची फलंदाजी ढासाळली
पंजाबकडून सुरवातीला फलंदाजीसाठी प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन सिंग मैदानात उतरले. यांनी 22 आणि 30 धावांची भागीदारी करत, सुरुवात चांगली करून दिली होती. त्यानंतर पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर देखील आपलं खात न उघडताच आल्या पाऊली माघारी परतला. त्यानंतर जोश इंगलिस, प्रभसिमरन सिंग, नेहल वधेरा असं करत हळूहळू सगळे फलंदाज आपल्या तंबूत माघारी परतले.
कोलकत्ताची भेदक गोलंदाजी
तर तिकडे कोलकाताच्या गोलंदाजांची भेदक गोलंदाजी पाहायला मिळाली. वरुण चक्रवर्थी प्रत्येकी 2 तसेच सुनील नारायण प्रत्येकी 2 तर, वैभव अरोरा आणि ॲनरिक नॉर्त्ये यांनी प्रत्येकी 1-1 विकेट्स घेत पंजाबचा फलंदाजांचा गाचा गुंडाळला. तर हर्षित राणाने पंजाबला 3 धक्के दिले.
कोलकाता नाईट रायडर्सची प्लेइंग 11
अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंह, लवनिथ सिसौदिया, व्यंकटेश अय्यर, अनुकूल रॉय, मोइन अली, रमनदीप सिंह, आंद्रे रसेल, एनरिक नॉकिया, वैभव अरोड़ा, मयंक मारकंडे, स्पेंसर जॉनसन, हर्षित राणा, सुनील नारायण, वरुण चक्रवर्ती और चेतन सकारिया, क्विंटन डिकॉक (यष्टीरक्षक), रहमानुल्लाह गुरबाज (यष्टीरक्षक ), अंगकृष रघुवंशी, रोवमैन पॉवेल, मनीष पांडे
पंजाब किंग्जची प्लेइंग 11
श्रेयस अय्यर (कर्णधार), विशाक विजयकुमार, यश ठाकुर, हरप्रीत बराड़, विष्णु विनोद, मार्को जानसन, लॉकी फर्ग्यूसन, जोश इंगलिस, जेवियर बार्टलेट, कुलदीप सेन, पायला अविनाश, सूर्यांश शेडगे, मुशीर खान, हरनूर पन्नू, आरोन हार्डी, प्रियांश आर्य, अजमतुल्लाह उमरजई, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मार्कस स्टोइनिस, नेहल वढेरा, ग्लेन मॅक्सवेल.