काल दुबईच्या मैदानात दोन कट्टर प्रतिस्पर्धी दुबईच्या मैदानावर आमने-सामने आले होते. या सामन्यादरम्यान काय होणार याची उत्कंठा देशभरात क्रिकेप्रेमींना लागली होती. अखेर भारताने पाकिस्तानचा पराभव करत दणदणीत वियज मिळवला. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानने भारताला 242 धावांचे आव्हान दिले होते, आणि भारताने 244 धावा पुर्ण करत 6 विकेट्स राखून पाकिस्तानवर विजय मिळवला. पाकिस्तानची सुरुवात चांगलीच झाली होती.
पाकिस्तानने 8 ओव्हरमध्ये चौकार-षटकार मारत 37 धावा केल्या होत्या. यानंतर बाबर आझम आणि इमाम उल हक हे दोघे मैदानात आले आणि बाबर आझमचा बदला घेत हार्दिक पांड्याने त्याची विकेट घेतली. बाबरने सुरूवातीलाच पाच चौकार लगावत 26 बॉलमध्ये 23 धावा धावा केल्या होत्या. यानंतर बाबर आझमने आऊट होण्याच्या आधीच्या बॉलवर चौकर मारला होता.
त्यानंतर कव्हर ड्राइव्ह शॉट खेळताना त्याच्या बॅटच्या कडेला बॉल लागला आणि बॉल टीम इंडियाचा विकेटकिपर के.एल. राहूलच्या ग्लव्ह्जमध्ये पोहचला. ऑलराउंडर हार्दिक पांड्याने दुसर्याच बॉलवर बाबर आझमला 23 धावांवर परत पाठवले. हे पाहाताच भारतीय संघाच्या चाहत्यांमध्ये एकच आनंदाची लाट उसळली. विकेट घेताच हार्दिकने बाबरला 'बाय-बाय' करत डिवचल, हार्दिकने त्याच्या हटके स्टाइलमध्ये केलेलं सेलीब्रेशन सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.