क्रिकेट

MI vs SRH : 144 धावांचं लक्ष्य देत हैदराबादची 'क्लास' खेळी, मात्र इशानच्या विकेटने मुंबई आली 'Fixing'च्या चर्चेत

MI vs SRH: हैदराबादची 144 धावांची खेळी, इशान किशनच्या विकेटमुळे मुंबईवर फिक्सिंगच्या चर्चेचा डाग.

Published by : Prachi Nate

आज हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद हा सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू झाली आहे. यादरम्यान मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे हैदराबादला प्रथम फलंदाजी करावी लागली आहे. सुरुवातीला हैदराबादचा संघ ढासाळला होता.

ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा हे हैदराबादचे खेळाडू फलंदाजीसाठी आले. मात्र ट्रेव्हिस हेड शून्यावर बाद झाला ज्यामुळे तो आपलं खात न उघडताच परतला. त्यामुळे मुंबईची डोकेदुखी असणारा हेड आज हैदराबादची डोकेदुखी वाढवताना दिसला. त्याचसोबत तिसऱ्या ओव्हरमध्ये बोल्टने अभिषेक शर्माला बाद केले. त्याचसोबत नितीश रेड्डीही बाद झाला.

त्यानंतर क्लासेन आणि अनिकेत यांच्या येण्याने हैदराबाद सावरत असताना हार्दिक पंड्याने त्यालाही 9 व्या ओव्हरमध्ये माघारी पाठवले. यानंतर अभिनव मनोहर आणि हेनरिक क्लासेन यांनी हैदराबादचा डाव सावरला. क्लासेनच्या खेळीमुळे हैदराबादचा संघ 100च्या टप्पा पार केला. क्लासेनने 71 धावांची खेळी केली तर मनोहरने 41 धावा केल्या. त्यामुळे हैदराबादने मुंबईसमोर 144 धावांच आव्हन ठेवलं.

तर दुसरीकडे इशान किशनच्या विकेटमुळे मुंबई इंडियन्सवर मॅच फिक्सिंगचा डाग लागलेला आहे. ज्यावेळी तिसऱ्या ओव्हरमध्ये दीपक चहर गोलंदाजीसाठी आला तेव्हा त्याने पहिल्याच बॉलवर इशान किशन कॅचआउट केल. बॅटचा एज लागून चेंडू विकेटकिपरकडे गेल्याचे इशानला वाटले. त्यामुळे अंपायरला देखील सुरुवातीला वाइड असल्याचं वाटलं त्यामुळे अंपायरने वाइडचा कॉल दिला. बॅट चेंडूला लागल्याचे इशानला वाटल त्यामुळे दीपक चहरने अपील केल्यानंतर अंपायरने निर्णय बदलला आणि इशान आउट झाल्याची घोषणा केली. विकेटकिपर रायन रिकल्टनने स्टंपमागे कॅच पकडून इशानला आऊट केल असं सांगितल.

मुंबई इंडियन्सची प्लेईंग 11-

रायन रिकल्टन, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ड, जसप्रीत बुमराह, विग्नेश पुथूर.

सनरायजर्स हैदराबादची प्लेईंग 11-

अभिषेक शर्मा, ट्रेव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कर्णधार), जयदेव उनदकट, हर्षल पटेल, ईशान मलिंगा, झीशान अन्सारी.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Manoj Jarange Mumbai Morcha : "सरकारला दंगल घडवायची आहे..." जरांगेंचा सरकारवर निशाणा

Manoj Jarange Mumbai Morcha : "सरकारने पाठवलेल्या लोकांचा गोंधळ" जरांगेंचा सरकारवर हल्लाबोल

Latest Marathi News Update live : मुंबईमध्ये मराठा आंदोलकांचं आंदोलन....

Mumbai Police : 'त्या' गोष्टीनंतर शरद पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’ घराबाहेर सुरक्षा वाढवली