क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे सध्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेकडे लागलं आहे. असं असताना आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय संघ लवकरच जाहीर केला गेला आहे. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि रोहित शर्मा आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संघाची घोषणा करण्यात आली आहे.
संघ निवडीसाठी बैठक सुरू असताना काही वेळाने खेळाडूंची नावे घोषित केली आहे. यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफी 'हायब्रिड मॉडेल' अंतर्गत पाकिस्तान आणि दुबईमध्ये खेळवली जाणार आहे. स्पर्धेचा पहिला सामना 19 फेब्रुवारी रोजी कराची येथे यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. तर भारतीय संघ 20 फेब्रुवारी रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर बांगलादेशविरुद्ध पहिला सामना खेळेल.
भारतीय संघाची घोषणा
आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफी 2025 साठी 15 सदस्यांसह भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यात रोहित शर्मा कर्णधार, तर शुभमन गिल उपकर्णधार असेल. तसेच यात यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग यांचा समावेश असणार आहे.