क्वालालंपूर येथील बाय्युमास ओव्हल येथे आयसीसी अंडर 19 महिला टी20 विश्वचषक 2025 स्पर्धेला सुरुवात झाली असून भारत विरुद्ध मलेशिया सामन्यात भारताने मलेशियाचा दारुण पराभव केला आहे. भारतीय संघाने 17 बॉलमध्ये हा सामना जिंकला असून मलेशियाच्या 10 विकेट घेत हा पराभव केला आहे. भारताने वेस्ट इंडीजचा 9 गडी राखून विजय मिळवला होता. त्यामुळे या स्पर्धेतील हा भारताचा सलग दुसरा विजय आहे.
मलेशियामधील कोणताच खेळाडू दुहेरी आकडा गाठू शकला नाही तसेच भारतीय संघाने अवघ्या 2.5 षटकांत बिनबाद 32 धावा करून सामना जिंकला. टीम इंडियाच्या गोलंदाजीसमोर मलेशियन संघाचा डाव चांगलाच गारद झाला. तर या सामन्यामध्ये टीम इंडियासाठी वैष्णवी सलामीवीर ठरली. वैष्णवीच्या दमदार कामगिरीमुळे भारताने मलेशियावर विजय मिळवत ऐतिहासिक विजयाची कामगिरी बजावली आहे.
भारतीय महिला संघ
गोंगडी त्रिशा, जी कमलिनी(wk),सानिका चाळके, निकी प्रसाद (c), भाविका अहिरे, मिथिला विनोद, आयुषी शुक्ला, जोशिता VJ, पारुनिका सिसोदिया, शबनम मो. शकील, सोनम यादव, वैष्णवी शर्मा, धृती केसरी, आनंदिता किशोर.