पहलगाम येथील हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानसोबत कोणताही सामना खेळणार नाही असे वक्तव्य अनेक राजकीय नेत्यांकडून केले जात होते. यादरम्यान नुकतचं पार पडलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर दोन्ही देश पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत. आशिया कप 2025 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झालं असून 9 ते 28 सप्टेंबर दरम्यान हे थरारक सामने रंगणार आहेत. 14 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान सामना खेळवला जाणार आहे.
याचपार्शवभूमीवर संसदेच्या पावसाळी अधिवेशनात एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसींनी भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅचवरून मोदींसमोर थेट प्रश्नचिन्ह उपस्थितीत केला. बैसरन खोऱ्यात मारल्या गेलेल्या लोकांनंतर देखील सरकार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला परवानगी कसे देऊ शकतात? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
यानंतर आता भारत आणि पाकिस्तान सामन्यासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर येत आहे. जर हा सामना खेळवला गेला नाही, तर याचा फायदा पाकिस्तानला होणार असल्याचं क्रिकेट विश्वातून मिळालेल्या माहितीनुसार समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार भारत आणि पाकिस्तान सामना खेळवला जाणार. कारण ही द्विपक्षीय मालिका नसून अनेक संघ सहभागी असलेली स्पर्धा आहे. त्यामुळे जर हा सामना झाला नाही तर पाकिस्तानला सामन्याशिवाय विजय मिळेल. त्यामुळे हा सामना न झाल्याच पाकिस्तानला फायदा होईल.
तसेच बीसीसीआयच्या सुत्राकडून समोर आलेल्या माहितीनुसार, ACC बैठकीत परवानगी मिळाल्यानंतर भारत- पाकिस्तान सामन्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे बीसीसीआय आता सामन्यातून माघार घेऊ शकत नाही. भारतातून या सामन्याला जरी विरोध असला तरी, आत्ताच्या घडीला काही बदल होऊ शकत नाही. त्यामुळे यावर नेमका काय समाधान काढणार हे पाहण महत्त्वाच ठरणार आहे.