महाकुंभमेळ्यात प्रसिद्धी मिळवलेल्या IIT बाबाने दुबईमध्ये झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान या महासंग्राम सामन्यावर भविष्यवाणी केली होती. 'टीम इंडिया हा सामना हरणार तुम्ही काहीही करा तरी जिंकणार नाही' असं वादग्रस्त वक्तव्य बाबांनी केलं होत. त्यामुळे बाबांवर मोठ्या प्रमाणात क्रिकेटप्रेमींचा आक्रोश पाहायला मिळत आहे. तर नुकत्याच झालेल्या भारत आणि पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सामन्यामध्ये भारताने पाकिस्तानाला धूळ चारली आहे.
पाकिस्तानने नाणेफेक जिंकत सुरुवातीला फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी भारताला 242 धावांचे आव्हान दिले होते. या सामन्यात 6 विकेट्स राखून भारताने दणदणीत विजय मिळवला आहे. हा विजय मिळवताच IIT बाबाची भविष्यवाणीवर देखील भारतीय संघाच्या खेळाडूंनी मात केली. यादरम्यान आता IIT बाबा पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात ट्रोल होत असताना दिसत आहे.
IIT बाबांची भविष्यवाणी काय होती?
बाबा म्हणाले होते की, "यावेळी भारताचा पाकिस्तानसमोर टिकाव लागणार नाही. विराट कोहली किंवा रोहित शर्मा याने कितीही प्रयत्न केले तरी भारत ही चॅम्पियन ट्रॉफी जिंकणार नाही. मी म्हणतोय नाही जिंकणार तर नाही जिंकणार भारत हा सामना, देव मोठा आहे की तुम्ही. आता तुम्हाला काय करायचं ते करा पण भारत हा सामना जिंकण कठीण आहे. पाकिस्तान भारताचा पराभव करेल. आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा मी जिंकून दिली होती, मी रोहितला सांगितलं होतं की, कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजी द्यायची. पण आता सगळ उलट केल आहे मी, यावेळेस भारत हरणार". त्यांच्या या भविष्यवाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. त्यांच्या या भविष्यवाणीवर भारतीय क्रिकेटप्रेमींकडून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला गेला.