क्रिकेट

Ind vs Aus 1st ODI : 2 वर्षानंतर ऑस्ट्रेलियात पुन्हा तेच घडलं! 2023 मध्ये टीम इंडियाने 10 षटकात जे केलं तेच आता देखील झालं

पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज 19 ऑक्टोबरला खेळवला जात आहे.

Published by : Prachi Nate

पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज 19 ऑक्टोबरला खेळवला जात आहे. या सामन्यावेळी पावसाची हजेरी सतसत असल्यामुळे हा सामना 26 षटकांचा सामना खेळवण्यात आला. यावेळी भारताचे स्टार खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा देखील या मालिकेत सहभागी झाले असून दोघांकडून चाहत्यांनी फार अपेक्षा ठेवल्या होत्या.

मात्र क्रिकेटप्रेमींचा सनडे फनडेमध्ये न जाता निराशेत जात असल्याचं दृष्य आजच्या सामन्यात पाहायला मिळालं आहे. यावेळी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, भारताची सुरुवात चांगली झाली नाही. टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा अवघ्या 8 धावांसह माघारी फिरला, तर दुसरीकडे विराट कोहलीने 8 चेंडूंमध्ये एकही रन केला नाही, ज्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींमध्ये निराशा निर्माण झाली.

तसेच शुबमन गिल 10 धावा करू बाद झाला तर टीम इंडियाने 8.1 षटकात 3 गडी गमवून 25 धावा केल्या. तसेच 10 षटकात फक्त 27 धावा करू शकले. टीम इंडियाने केलेली ही कामगिरी 2023 मध्ये पार पडलेल्या ऑस्ट्रेलियाविरुदधच्या सामन्याची आठवण करुन देणारी ठरली. कारण, त्यावेळी देखील टीम इंडियाने 10 षटकात 27 धावा केल्या होत्या. आता पुन्हा तसंच घडलं आहे. दरम्यान यावेळी भारताने 26 षटकात 9 गडी गमवून 136 धावा केल्या.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा