क्रिकेट

RCB vs PBKS IPL 2025 : पंजाबच्या नावे नको असलेला रेकॉर्ड! RCB vs PBKS सामन्यात नेमकं असं काय घडलं?

पंजाब संघ आयपीएल प्लेऑफमध्ये सर्वात कमी ओव्हरमध्ये ऑलऑऊट होणारा संघ बनलाअसून त्यांच्या नावावर नको असलेला रेकॉर्ड नोंदवण्यात आला आहे.

Published by : Prachi Nate

चंदीगडमधील मुल्लानपूर येथील महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पंजाबचा डाव लवकरच आटोपला. काल IPL 2025 च्या फायनलमध्ये जाण्याच्या शर्यतीत आरसीबीने बाजी मारली आहे. आरसीबीने 106 धावांसह पंजाबचे 8 गडी बाद करत फायनलमध्ये एन्ट्री केली आहे. आरसीबीची ही चौथी वेळ आहे, ते यापुर्वी सलग तीन वेळा फायनलमध्ये पोहचले आहेत.

यादरम्यान बंगळुरू विरुद्ध पंजाब या सामन्यात पंजाबचा फॉर्म खुप खराब पाहायला मिळाला. अवघ्या 101 धावांसह पंजाब संघाने पराभव पत्कारले. या सामन्यात पंजाबकडून मार्कस स्टोयनिसने 26, अझमतुल्लाह उमरझाईने 18 आणि प्रभसिमरन सिंगने 18 धावा केल्या, तर नेहल वढेरा 8, प्रियांश आर्य 7, जोश इंग्लिश 4 आणि श्रेयस अय्यर 2 धावा करुन माघारी फिरले. त्यामुळे पंजाबचे स्टार फलंदाज अपयशी ठरले. पंजाब संघ आयपीएल प्लेऑफमध्ये सर्वात कमी ओव्हरमध्ये ऑलऑऊट होणारा संघ बनला आहे. त्यामुळे पंजाबच्या नावावर नको असलेला रेकॉर्ड नोंदवण्यात आला आहे.

याआधी 2008 मध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यात दिल्लीने अवघे 87 धावा करत पराभव पत्कारला होता. तर यावेळी राजस्थान रॉयल्सने 192 धावांसह सामना जिंकला होता. त्याचसोबत 2010 मध्ये डेक्कन चार्जर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामन्यात डेक्कन चार्जर्सने 104 धावा केल्या होत्या. त्यानंतर आता आयपीएल 2025 मध्ये पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल्स चॅलेजर्स बंगळुरू या सामन्यात पंजाबने 101 धावा करत तब्बल 17 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा