सिडनी मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचव्या कसोटीच्या थरारक खेळाचा जलवा पाहायला मिळत आहे. दोन्ही संघाकडून जोरदार खेळी खेळली जात आहे. पहिल्याच डावात भारतीय संघाकडून 185 धावा आटोपात आणल्या गेल्या आहेत. तर ऑस्ट्रेलियाकडून 181 धावांसह खेळी खेळली गेली.
अशातच दुसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात भारतीय संघाच्या तुफानी फलंदाजी ऋषभ पंतची आक्रमक खेळी पुन्हा एकदा पहायला मिळाली. यावेळी पंतने पहिल्या बॉलवरचं स्कॉट बोलँडला षटकार ठोकला अन् अवघ्या 29 बॉलमध्ये आपली सेंच्युरी पूर्ण केली. सिडनी कसोटीच्या दुसऱ्या डावात ऋषभ पंतने वादळी फलंदाजी करत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई केली. ऋषभ पंत फलंदाजीसाठी ज्यावेळेस क्रीझवर आला त्यावेळी भारतीय संघाने 78 धावांवर 4 विकेट गमावल्या होत्या.
ऋषभ पंतची दमदार फटकेबाजी
दरम्यान या सामन्यात ऋषभ पंतची कामगिरी ही 33 बॉवर 6 चौकार आणि 4 षटकारांसह 61 धावांची खेळी करणारी होती. यामुळे रिषभ पंत हा ऑस्ट्रेलियात सर्वात जलद कसोटी अर्धशतक करणारा प्रतिस्पर्धी संघाचा पहिलाच फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम इंग्लंडच्या जॉन ब्राउन आणि वेस्ट इंडिजच्या रॉय फ्रेडरिक्स याच्या नावावर होता, ज्यांनी ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर कसोटी क्रिकेटमध्ये 33 बॉलसह अर्धशतक केले होते. पण आता ऋषभ पंतने त्याला मागे टाकत हा रेकॉर्ड स्वत:च्या नावी केला आहे. भारताकडून कसोटी क्रिकेटच्या इतिहासात हे दुसरे सर्वात जलद अर्धशतक असून याआधी पंतने 2022 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 28 बॉलसह अर्धशतक झळकावले होते. जे भारताच्या फलंदाजाने झळकावलेले सर्वात जलद अर्धशतक आहे.