सिडनी मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचव्या कसोटीत ऋषभ पंतची थरारक खेळी पाहायला मिळाली. पंतने पहिल्या बॉलवरचं स्कॉट बोलँडला षटकार ठोकला अन् अवघ्या 29 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केले. सिडनी कसोटीच्या दुसऱ्या डावात रिषभ पंतने वादळी फलंदाजी करत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना चांगलाच चोप दिला आहे. रिषभ पंत फलंदाजीसाठी ज्यावेळेस क्रीझवर आला त्यावेळी भारतीय संघाने 78 धावांवर 4 विकेट गमावल्या होत्या.
तर पहिल्याच डावात भारतीय संघाकडून 185 धावा आटोपात आणल्या गेल्या आहेत. या सामन्यात रिषभ पंतची कामगिरी ही 33 बॉवर 6 चौकार आणि 4 षटकारांसह 61 धावांची खेळी करणारी होती. यामुळे रिषभ पंत हा ऑस्ट्रेलियात सर्वात जलद कसोटी अर्धशतक करणारा प्रतिस्पर्धी संघाचा पहिलाच फलंदाज ठरला आहे. त्याने पहिल्या चेंडूपासून ऑस्ट्रेलियाला खिंडार पाडले आहे. यादरम्यान क्रिकेटचा देव अर्थातच सचिन तेंडुलकरला देखील ऋषभ पंतच्या या वादळी खेळीची भूरळ पडली आहे. याचपार्श्वभूमीवर सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर ऋषभ पंतसाठी पोस्ट केली आहे.
सचिन तेंडुलकरची पोस्ट
'ज्या विकेटवर बहुतेक फलंदाजांनी 50 किंवा त्यापेक्षा कमी SR वर फलंदाजी केली असेल, तिथे ऋषभ पंत पंतची १८४ च्या स्ट्राइक रेटने केलेली खेळी खरोखरच उल्लेखनीय आहे. त्याने पहिल्याच चेंडूपासून ऑस्ट्रेलियाला अडचणीत आणलं. त्याला फलंदाजी करताना पाहणं नेहमीच मनोरंजक असतं. किती प्रभावी खेळी!'