सिडनीमध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024 ची मालिकाची समाप्ती झाली आहे. ऑस्ट्रेलिया संघाने या मालिकेवर 3-1 विजया मिळवला आहे. पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024साठी मालिकेतील पहिला सामना जिंकण्यात भारतीय संघाला नक्कीच यश आले होते, पण चार सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचा दमदार खेळ दिसून आला. या मालिकेत भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूने नक्कीच जीवतोड मेहनत घेतली आहे.
मात्र, शेवटी भारतीय फलंदाजीबरोबरच गोलंदाजीनेही निराशा केली. ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 विकेट्सनी पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवलाच तसेच तब्बल दहा वर्षांनी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीवर नाव कोरले. याचसोबत डब्ल्यूटीसी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाची वर्णी लागली आहे. ऑस्ट्रेलियाकडून स्टार्कने 3 आणि बोलंड 4 विकेट घेतल्या. तर कॅमिन्सला 2 आणि लायनला 1 विकेट मिळाली अशा प्रकारे ऑस्ट्रेलिया गोलंदाजी करताना स्कॉट बोलंड आणि मिचेस स्टार्कने कहर केला.
सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाने विजय पटकावत डब्ल्यूटीसी फायनलमध्ये मिळवले यजमान पद
सिडनी कसोटीत भारताने पहिल्या डावात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर भारतीय संघाने 162 धावांचे लक्ष्य दिले होते. ऑस्ट्रेलियाने 4 गडी गमावून, ट्रॅव्हिस हेड 34 आणि वेबस्टर 39 यांच्या नाबाद खेळीच्या जोरावर ऐतिहासिक मालिका विजयावर शिक्कामोर्तब केला. या विजयाने ऑस्ट्रेलियाने डब्ल्यूटीसी फायनलमध्ये धडक मारली असून टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल 2025 च्या शर्यतीतूनही बाहेर झाली आहे. या पराभवामुळे कोट्यवधी भारतीय चाहत्यांची निराशा केली.
कसा होता पहिला डाव
भारताने पहिल्या डावात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत असताना केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल स्वस्तात बाद झाले. शुभमन गिल देखील 20 धावांसह बाद झाला. विराट कोहली थोडा वेळ लयीत दिसला पण शेवटी ऑफ स्टॅम्पच्या बॉलचा बळी ठरला. पंत आणि जडेजाच्या जोडीने संघाची कमान हाती घेतली. अशा रितिने भारताने पहिल्या डावात 185 धावा केल्या होत्या. यावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 181 धावांसह सामना आटोपला.
कसा होता दुसरा डाव
दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी निराशा केली कारण, कोणीही 22 पेक्षा जास्त धावा करू शकला नाही. भारताचा दुसरा डाव 157 धावांत आटोपला आणि ऑस्ट्रेलियाला 162 धावांचे लक्ष्य दिले होते. भारताकडे पहिल्या डावानंतर 40 धावांची आघाडी होती. मात्र दुसऱ्या डावात ऋषभ पंतने 33 बॉलमध्ये 61 धावा केल्या ज्यामुळे तो संघासाठी सर्वाधिक धावा करणारा ठरला. ऑस्ट्रेलियाकडून स्कॉट बोलंडने 6 विकेट घेतल्या. यानंतर ऑस्ट्रेलियाने ट्रॅव्हिस हेड 34 आणि वेबस्टर 39 यांच्या नाबाद खेळीच्या जोरावर विजयावर शिक्कामोर्तब केला.