थोडक्यात
भारताच्या महिला संघाचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय
जेमिमा ठरली विजयाची हिरो
टीम इंडियाची वर्ल्डकप फायनलमध्ये धडक
(IND W vs AUS W) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला विश्वचषक 2025च्या उपांत्य फेरीतील सामना खेळवला गेला. या सामन्यात भारताच्या महिला संघाने ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला आहे. भारताकडून जेमिमा रॉड्रीग्जने जबरदस्त शतकी खेळी केली.
ऑस्ट्रेलियाने सेमीफायनल सामन्याची नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला आणि 338 धावांचे आव्हान भारताच्या महिला संघासमोर ठेवलं. टीम इंडियाच्या महिला फलंदाजांनी 5 विकेट राखून हे आव्हान पूर्ण केलं. भारत फायनलमध्ये पोहोचल्यावर टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरला अश्रू अनावर झाले.
कर्णधार हरमनप्रीत कौरच्या 89 धावांच्या खेळी आणि जेमिमा रॉड्रिग्जच्या 125 धावांची खेळी करत विजयाचं लक्ष्य गाठलं. भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवला. या ऐतिहासिक विजयानंतर मैदानात एकच जल्लोष करण्यात आला.