क्रिकेट

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी नावाचे वादळ पुन्हा जोमात, 52 चेंडूत 10 चौकार अन् 7 षटकारांसह इंग्लंडला चोपल

भारत आणि इंग्लंड अंडर 19 मॅचमध्ये चौथ्या वनडे सामन्यात जोरदार शतक ठोकत इंग्लंडच्या बॉलर्सची धुलाई केली.

Published by : Prachi Nate

भारत आणि इंग्लंड अंडर 19 मॅचमध्ये चौथ्या वनडे सामन्यात जोरदार शतक ठोकत इंग्लंडच्या बॉलर्सची धुलाई केली. 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने आपली दमदार छाप दाखवत विजयाचे शतक झळकावले. या मालिकेमध्ये यापूर्वी दोनदा अर्धशतकांची संधी हुकलेली होती. मात्र ही कसर भरून काढत वैभव सूर्यवंशीने फक्त 52 चेंडूत 10 चौकार आणि 7 षटकार मारत शतक पूर्ण केलं. इंग्लंडच्या गोलंदाजांना अक्षरशः धूळ चारत आपले यशस्वी शतक ठोकले.

वैभव सूर्यवंशीने सुरुवातीपासूनच शानदार खेळीला सुरुवात करत षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडला. अंडर 19 क्रिकेट स्पर्धेत इतका जलद शतक ठोकणारा खेळाडू म्हणून वैभव सूर्यवंशीचे नाव लिहिले गेले आहे. यापूर्वीच्या सामन्यातही वैभव सूर्यवंशीने धमाकेदार फलंदाजी करत सामनावीराचा 'किताब आपल्या खिशात घातला होता. वैभवने जयपूरमध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध सर्वात जलद शतक ठोकत आपले नाव आधीच कोरले होते, आता ही इंग्लंड मध्येही असाच धमाकेदार परफॉर्मेन्स पाहायला मिळत आहे.

मागील दोन सामन्यांमध्ये हुकलेले अर्धशतकाची तूट वैभव सूर्यवंशीने या सामन्यात भरून काढत जलद शतक ठोकणारा खेळाडू असा 'किताब आपल्या नावावर केला. विशेष म्हणजे स्ट्राईक रेट 183.33 ने त्याने हे जलद शतक केले. भारत आणि इंग्लंड च्या चौथ्या वनडे मध्ये त्याने आपल खणखणीत शतक ठोकत विश्वविक्रमाला गवसणी घातली. वैभव सूर्यवंशीच्या अगदी लहान वयातच इतक्या आक्रमक आणि शानदार खेळीमुळे येत्या काळात त्याला भारतीय टीममध्ये अढळ स्थान मिळेल यात शंका नाही.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा