भारत आणि इंग्लंड यांच्यातील थरार अखेर शेवटच्या टप्प्यावर असताना 2-2 अशी बरोबरी करत पार पडला आहे. केनिंग्टन ओव्हल मैदानावर अत्यंत रोमांचक अशी सुरु असलेली पाचवा कसोटी सामना भारताने विजयासह संपवली. पाचव्या सामन्यात भारताने इंग्लंडसमोर 374 धावांचे आव्हान दिले होते. ज्याच्या पाठलाग करत इंग्लंडने 367 धावा करत हातातला डाव गमावला.
यावेळी मोहम्मद सिराजने केलेल्या शानदार गोलंदाजीमुळे आणि प्रसिद्ध कृष्णाने दिलेली साथ यामुळे अंतिम सामन्याचे चित्र पालटले. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पतौडी ट्रॉफी कसोटी मालिकेचे नाव आता अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी असे ठेवण्यात आले आहे. ही कसोटी नुकतीच पार पडली असून आता ही ट्रॉफी कोणाकडे ठेवली जाणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अँडरसन तेंडुलकर कसोटी सामन्याची ट्रॉफी लॉर्ड्स येथे असलेल्या ईसीबी मुख्यालयात ठेवली जाणार आहे. याच कारण असं की, पतौडी ट्रॉफीच्या नावाखाली आयोजित कसोटी मालिका कोणी जिंकली हे येथे विचारात घेतले जाणार नाही, अशी चर्चा आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील मागील पतौडी ट्रॉफी कसोटी मालिका इंग्लंडने जिंकली होती. त्यामुळे ही मालिका अनिर्णित राहिली तर ट्रॉफी इंग्लंडकडेच राहील असं सांगितलं जात होतं.