भारतीय क्रिकेट संघाचा विस्फोटक फलंदाज रिंकू सिंग आणि समाजवादी पक्षाची खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा आज लखनऊच्या हॉटेल द सेंट्रम येथे पार पडला आहे. 26 वर्षीय प्रिया सरोज या व्यवसायाने वकील असून, त्यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मच्छलीशहर मतदारसंघातून पहिल्यांदाच खासदार म्हणून विजय मिळवला आहे.
त्यांचे वडील तूफानी सरोज हे सध्या केराकतचे आमदार आहेत. तर रिंकू सिंग त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातात. त्याने भारताकडून 2 वनडे आणि 33 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आयपीएलमध्ये ते कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी नियमित खेळत आहे.
या दोघांच्या साखरपुड्याला अखिलेश यादव यांच्यासह समाजवादी पक्षाचे 25 खासदार त्याचसोबत 300 हून अधिक पाहुणे उपस्थित आहेत. तर या साखरपुड्यादरम्यान दोघांच्या एन्ट्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांचा विवाह 18 नोव्हेंबर रोजी वाराणसीमध्ये होणार आहे.