क्रिकेट

Operation Sindoor : एअर स्ट्राइटचा अभिमान, भारतीय क्रिकेटर्सनंही दिल्या 'भारत माता की जय'च्या घोषणा

भारतीय क्रिकेटपटूंच्या 'भारत माता की जय' घोषणांनी देशभरात आनंद, दहशतवाद्यांना धडा शिकवणाऱ्या ऑपरेशन सिंदूर मिशनचा गौरव.

Published by : Prachi Nate

भारतीय सशस्त्र दलांनी बुधवारी 7 मेला पहाटे पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर (पीओजेके) मधील नऊ दहशतवादी छावण्यांवर हल्ला करून ' ऑपरेशन सिंदूर ' सुरू केले. भारताच्या एअर स्ट्राईकनंतर बिथरलेल्या पाकिस्ताननं सीमा रेषेवरील राजौरी येथे स्थानिकांच्या घरांवर फायरींग केली आहे. यात काही नागरिक मारले गेल्याचं समोर आलं आहे. भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये तीन प्रमुख दहशतवादी ठार झाल्याची माहिती देखील समोर आली आहे.

बहावलपूर येथील हल्ल्यात मसूद अझहर, मुरिदके येथील हल्ल्यात हाफिज सईद आणि सियालकोटमध्ये सलाहुद्दीनला ठार करण्यात भारतीय लष्कराला यश आलं आहे. त्याचसोबत भारताच्या वायुदलाच्या जवानांनी पाकिस्तानमधील दहशतवादी स्थळ भिंबर, कोटली, सरजाल सियालकोट, मेहमूना जोया, मरकज् तैबा मुरीदके, मरकज् सुभान अल्लाह बहावलपूरसह 9 ठिकाणी दहशतवादी तळं उद्धवस्त करण्यात यश मिळवलं आहे.

याचपार्श्वभूमीवर संपुर्ण भारतात आनंद व्यक्त केला जात आहे. दरम्यान भारतीय क्रिकेटपटूंनी खांद्याला खांदा लावून देशासाठी अभिमान व्यक्त केला आहे. ऑपरेशन सिंदूरवर भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन, गौतम गंभीर, सुरेश रैना, उमेश यादव, प्रग्यान ओझा आणि आरपी सिंग यांसारख्या खेळाडूंनी 'जय हिंद' आणि 'भारत माता की जय' अशा मनापासून घोषणा देत मनापासून पोस्ट शेअर केल्या आहेत.

ऑपरेशन सिंदूर म्हणजे काय?

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा महिलांना सोडून त्यांच्या पतींना मारलं होतं. महिलांच्या कपाळावरचं कुंकू पुसलं होतं. त्यांच्या डोळ्यादेखत त्यांच्या पतींना गोळ्या झाडल्या होत्या. त्यालाच प्रत्युत्तर देण्यासाठी या मिशनचं नाव ‘मिशन सिंदूर’ ठेवलं गेलं. भारतीय सैन्य दलाने या मिशन अंतर्गत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आहेत. या माध्यमातून भारताने दहशतवाद्यांना धडा शिकवला आहे. दहशतवाद्यांनी यापुढे कोणत्याही महिलेचं सिंदूर पुसण्याची हिंमत केली तर ते युद्धासारखं मानलं जाईल हा स्पष्ट संदेश या प्रत्युत्तरातून दिला आहे.

"एकतेत निर्भय. शक्तीत अमर्याद. भारताची ढाल तिचे लोक आहेत. या जगात दहशतवादाला जागा नाही. आपण एक संघ आहोत! जय हिंद #ऑपरेशनसिंदूर" अशी पोस्ट सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर केली आहे.

"आपल्या धाडसी आणि विनोदी भाष्यासाठी प्रसिद्ध असलेले वीरेंद्र सेहवाग यांनी सोशल मीडियावर हिंदीत एक ज्वलंत पोस्ट टाकली ज्याचे भाषांतर आहे - जर कोणी तुमच्यावर दगड फेकला तर तुम्ही त्याच्यावर फूल फेकून द्या, पण फलदानी सकट . जय हिंद!" #ऑपरेशनसिंदूर , किती योग्य नाव", अशी पोस्ट वीरेंद्र सेहवागने सोशल मीडियावर केली आहे.

आपल्या धाडसी आणि विनोदी भाष्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शिखर धवनने दहशतवादाविरुद्ध भूमिका घेतल्याचे व्यक्त केले "भारत दहशतवादाविरोधात भूमिका घेतो. भारत माता की जय!", अशी पोस्ट शिखर धवनने सोशल मीडियावर केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Meenatai Thackeray Statue : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Latest Marathi News Update live : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींनी घाईघाईने निर्णय घेऊ नका, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Kiran Kale Shivsena UBT : ठाकरेंच्या शिवसेनेच्या किरण काळेंवर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?