आशिया कप 2025 या स्पर्धेला सुरुवात झाली असून, आतापर्यंत टीम इंडियाने खेळलेल्या सामन्यात भारतीयय खेळाडूंच्या जर्सीवर कोणताही स्पॉन्सर पाहायला मिळाला नाही. मिळालेल्यया माहितीनुसार ऑनलाइन गेमिंग बिलामुळे ड्रीम11 ला गेल्या काही दिवसांपूर्वी बीसीसीआय सोबतचा करार रद्द करावा लागला होता. ज्यामुळे टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या.
अशातच टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, अपोलो टायर्स हा टीम इंडियाच्या प्रत्येक सामन्यासाठी 4.5 कोटी रुपये देणार आहे. सुरुवातीला ड्रीम11 टीम इंडियाच्या प्रत्येक सामन्याला 4 कोटी द्यायचा, मात्र आता अपोलो टायर्स 50 लाख जास्त देणार आहे. त्यामुळे अपोलो टायर्स टीम इंडियाचा नवीन जर्सी स्पॉन्सर असू शकतो. अपोलो टायर्स विशेषतः फुटबॉल क्लबसोबत जास्त जोडलेले आहेत. त्याचसोबत ते इतर क्रीडा संघ म्हणजेच, कंपनी मँचेस्टर युनायटेड, चेन्नई एफसी आणि इंडियन सुपर लीगशी देखील जोडलेले आहेत.
दरम्यान, स्पॉन्सरशीपसाठी 16 सप्टेंबर रोजी बोली ठेवण्यात आली होती. यासाठी बीसीसीआयने त्यांच्या निवेदनात स्पष्ट केले होते की, स्पॉन्सरशीपसाठी गेमिंग, बेटिंग, क्रिप्टो आणि तंबाखू कंपन्यांना बोली लावण्याची परवानगी दिली जाणार नाही. याचपार्श्वभूमिवर कॅनव्हा, जेके सिमेंट्स आणि बिर्ला ऑप्टस पेंट्सनेही टीम इंडियाचे नवीन जर्सी स्पॉन्सरसाठी बोली लावली होती, मात्र बिर्ला ऑप्टस पेंट्सला बोली लावायची नव्हती.
तसेच 2 ऑक्टोबरपासून भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. ज्यात पहिला कसोटी सामना अहमदाबादमध्ये आणि दुसरा कसोटी सामना 10 ऑक्टोबरपासून दिल्लीमध्ये खेळला जाईल. त्यामुळे जर अपोलो टायर्ससोबत बीसीसीआयचा करार झाला तर वेस्ट इंडिज दौऱ्यावर टीम इंडियाच्या जर्सीवर अपोलो टायर्स यांचे नाव असू शकते.