आयपीएलचा क्रेज देशभरात पाहायला मिळतो, यावर्षीचे सामने 22 मार्च 2025 पासून सुरु होणार असून या वर्षीचा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व कोलकाता नाइट रायडर्स यांच्यामध्ये ईडन गार्डनवर होणार आहे. आयपीएलच्या 18 व्या हंगामातील सामने एकूण 13 शहरांमध्ये खेळवले जातील. आयपीएल 2025 चे सामने लखनौ, मुंबई, हैदराबाद, चेन्नई, अहमदाबाद, विशाखापट्टणम, गुवाहाटी, बंगळुरु, न्यू चंदीगड, जयपूर, दिल्ली, कोलकाता आणि धर्मशाला येथे खेळवले जातील.
आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा यशस्वी आणि बहु चर्चेत असलेली टीम मुंबई इंडियन्स यांचा पहिला सामना 23 मार्चला मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स असा सामना होणार आहे. आयपीएलच्या लिलावापूर्वी फ्रँचायझीने हार्दिक, जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव व तिलक वर्मा या स्टार्सना संघात कायम राखले होते. त्यामुळे यंदा MI कडून चाहत्यांना चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. यादरम्यान मुंबई इंडियन्स टीमचे आयपीएल सामन्यादरम्यान संपुर्ण वेळापत्रक जाणून घ्या..
मुंबई इंडियन्सचे वेळापत्रक-
23 मार्च : मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स
29 मार्च : मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स
31 मार्च : मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
4 एप्रिल : मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स
7 एप्रिल : मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
13 एप्रिल : मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
17 एप्रिल : मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद
20 एप्रिल : मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स
23 एप्रिल : मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद
27 एप्रिल : मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स
1 मे : मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
6 मे : मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स
11 मे : मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स
15 मे : मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
हार्दिक पांड्यावर पहिलाच सामना खेळण्यावर बंदी
आयपीएल दरम्यान दुसऱ्या दिवशी होणारा मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्सचा सामना चेन्नई येथे एल क्लासिकोत होणार आहे. या सामन्यादरम्यान मुंबई इंडियन्स टीमचा कर्णधार हार्दिक पांड्याला पहिल्या सामन्यातून बाद करण्यात आलं आहे. आयपीएल 2024 मध्ये लखनऊ विरुद्ध झालेल्या शेवटच्या सामन्यात मुंबई इंडियन्स त्यांचे ओव्हर्स वेळेतपूर्ण करू शकली नव्हती, तीन ओव्हर-रेट गुन्ह्यांसाठी संपुर्ण टीमसह हार्दिक पांड्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे बीसीसीआयच्या नियमांनुसार, एखादा संघ जेव्हा एका हंगामात तीन वेळा ओव्हर-रेट राखण्यात अपयशी ठरतो, त्यावेळी त्या टीमच्या कर्णधारावर एका सामन्याची बंदी घातली जाते. त्यामुळे लीगच्या नियमांनुसार, हार्दिक पंड्यावर एका सामन्याचा बॅन लावण्यात आला. तर त्याच्या ऐवजी आता मुंबई इंडियन्स या संघाचे नेतृत्व स्टार फलंदाज रोहित शर्मा हा करणार असल्याच्या शक्यता आहेत.