आयपीएल 2025 स्पर्धेला येत्या 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. देशभरात आता क्रिकेट प्रेमींची आयपीएल 2025 ची उत्सुकता शिगेला पोहचलेली आहे. यावर्षीचे सामने 22 मार्च 2025 पासून सुरु होणार असून या वर्षीचा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व कोलकाता नाइट रायडर्स यांच्यामध्ये ईडन गार्डनवर होणार आहे.
त्यानंतर 23 मार्चला राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनराजझर्स हैदराबाद हा सामना होणार आहे. सामन्याआधीच राजस्थान रॉयल्स संघातून एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. सुरुवातीच्या 3 सामन्यांसाठी राजस्थान रॉयल्सने नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. सुरवातीच्या 3 सामन्यांसाठी रियान पराग याला संघाचा दोर सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
यामगचं कारण असं की, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन याच्या बोटाला दुखापत झाल्यामुळे तो विकेटकिपींग करताना दिसणार नाही. त्यामुळे रियान परागला कर्णधार म्हणून संघाची जबाबदारी सोपवली आहे. मागील वर्षी भारतीय संघातून खेळताना त्याचा रेकॉर्ड चांगला होता. या संघात संजू सॅमसननंतर रियान पराग हा सर्वात अनुभवी खेळाडू आहे. त्यामुळे त्याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.
राजस्थान रॉयल्स
फलंदाज
संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, शुभम दुबे, वैभव सूर्यवंशी, नितीश राणा, कुणाल राठोड, ऑल राउंडर, रियान पराग, वानिंदू हसरंगा.
गोलंदाज
संदीप शर्मा, जोफ्रा आर्चर, महिशा तिक्षणा, आकाश मढवाल, कुमार कार्तिकेय, युद्धवीर सिंग चरक, तुषार देशपांडे, फझलहक फारुखी, क्वेंना मफाका, अशोक शर्मा.