IPL 2025 चा अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि पंजाब किंग्ज (PBKS) यांच्यात ३ जून रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली PBKS तर विराट कोहली च्या नेतृत्वाखाली RCB हे दोन्ही संघ पूर्ण ताकदीने मैदानात उतरले अत्यंत चुरशीच्या या लढतीत विराट कोहलीच्या RCB संघाने बाजी मारत तब्बल १८ वर्षानंतर IPL 2025 च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. अत्यंत रोमहर्षक झालेल्या या सामन्यात विजेत्या संघावर अर्थात RCB संघावर बक्षीस रकमेचा पाऊस पडणार आहे.
3 जून रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये झालेल्या . IPL 2025 चा अंतिम सामना अत्यंत चुरशीचा ठरला. आणि अखेर बाजी मारत RCB संघ विजयी झाला. तस पाहता सुरुवातीपासुनच संघ तयार करण्यासाठी कोट्यवधी रुपये देऊन क्रिकेटर खरेदी केले जातात. प्रशिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना ही पैसे दिले जातात. मात्र . IPL ची ट्रॉफी जो जिंकतो त्या संघावर पैशांचा पाऊस पडतो. आयपीएल गव्हर्निंग कमिटी Indian Premier League 2025 च्या Winner आणि उपविजेत्या संघाला बक्षीस म्हणून ही एक विशिष्ठ रक्कम दिली जाते. अंतिम सामना जिंकणाऱ्या संघाला २० कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाते. तर उपविजेत्या संघाला 13 कोटी रुपये बक्षीस म्हणुन दिले जातात. त्याचबरोबर पात्रता फेरी गाठणाऱ्या संघाला ७ कोटी रुपये आणि एलिमिनेटर संघाला 6.5 कोटी रुपये बक्षीस रक्कम दिली जाते. 2022 पासून बक्षीस रक्कम जवळजवळ सारखीच असुन त्यात कोणतेही मोठे बदल करण्यात आलेले नाहीत. यामध्ये संघमालक ही मालामाल होतो. मात्र त्यांना किती रक्कम बक्षीस म्हणून मिळते याबाबत कोणतीही अधिकृत माहिती BCCI ने दिलेली नाही.
IPLमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्यांना ही बक्षिसे
आयपीएलमध्ये प्रत्येक हंगामात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना विशेष बक्षिसे दिली जातात. हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅपसह १० लाख रुपयांची बक्षीस रक्कम दिली जाते. सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपसह १० लाख रुपये मिळतात. तर 'मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर', 'सुपर स्ट्रायकर', 'पॉवर प्लेअर', 'मॅक्सिमम सिक्स' आणि 'गेम चेंजर' असे किताब जिंकणाऱ्या खेळाडूंना बक्षीस रक्कम देखील दिली जाते.