मुंबई इंडियन्सच्या माजी क्रिकेटरबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई इंडियन्सचा माजी क्रिकेटपटू शिवालिक शर्माला राजस्थानच्या जोधपुरमधील कुडी भगतानी हाऊसिंग बोर्ड पोलिसांनी अटक केले आहे. या माजी आयपीएल क्रिकेटपटूवर त्याच्या एका मैत्रिणीने बलात्काराचा आरोप केला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, क्रिकेटर शिवालिक शर्मा आणि आरोप करणाऱ्या मुलीची इन्स्टाग्रामद्वारे मैत्री झाली. यानंतर दोघांमधील मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. या काळात शिवालिक त्याला भेटण्यासाठी अनेक वेळा जोधपूरलाही गेला. त्या क्रिकेटपटूने तिला लग्न करण्याचे वचन दिले आणि दोघांनीही लग्न केले. मुलीने आरोप केला आहे की शिवालिकने तिला लग्नासाठी सतत फसवले आणि तिच्याशी शारीरिक संबंधही ठेवले.
कोणते आरोप दाखल केले :
सुमारे एक वर्ष एकत्र राहिल्यानंतर शिवालिकच्या कुटुंबाने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला असल्याचे पीडितेने सांगितले आहे. त्यानंतर मुलीने कुडी पोलिस ठाण्यात शिवालिक आणि त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल केला.या गंभीर आरोपांनंतर, शनिवारी शिवालिकला वडोदराच्या अटलदरा पोलिस स्टेशन परिसरातून अटक करण्यात आली. त्याला जोधपूर न्यायालयात हजर करण्यात आले, त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
IPL मध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वाखाली :
गेल्या वर्षी आयपीएलमध्ये हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सच्या संघात शिवलिक शर्माचा समावेश करण्यात आला होता. त्याला 20 लाख रुपयांना खरेदी करण्यात आले मात्र तो एकही सामना खेळू शकला नाही.