आयपीएलच्या 18 व्या हंगामाला आजपासून सुरुवात होत आहे. या हंगामात कोलकत्ता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे संघांमध्ये पाहिला सामना होईल. मागच्या पर्वातील विजेतेपद कोलकत्ता नाईट रायडर्सने जिंकले होते. कोलकत्ता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन्ही संघ कोलकत्त्याच्या ईडन गार्डनवर भिडणार असून, यापुर्वी हे दोन्ही संघ 35 वेळा आमनेसामने आले आहेत. या हंगामात दोन्ही संघाना नवीन कर्णधार मिळाले असून नव्या नेतृत्त्वाची कसोटी पाहायला मिळणार आहे. यामध्ये केकेआर संघाची जबाबदारी मराठमोळा खेळाडू अंजिक्य रहाणे तर आरसीबीची धुरा रजत पाटीदार याच्याकडे असणार आहे.
हा सामना कुठे पाहता येणार?
कोलकत्ता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामना शनिवारी 22 मार्च रोजी सुरु होणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता सामना सुरु होईल. सामना सुरु होण्यापुर्वी अर्धातास आधी नाणेफेक केली जाईल. हा सामना 'स्टार स्पोर्ट्स', 'जिओ हॉटस्टार'वर पाहायला मिळणार आहे.
संघातील खेळांडूची नावे
कोलकत्ता नाईट रायडर्स संघ- अंजिक्य रहाणे (कर्णधार), अनुकुल रॉय, मोईन अली, लवनीश सिसोदिया, सुनील नरेन, हर्षित राणा, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, व्यंकटेश अय्यर, वैभव पानवडे, वरुण चक्रवर्ती, हर्षत राणा, अॅनरिक नॉर्टजे, आंग्रिश रघुवंशी, रिंकू सिंग, क्विंटन नॉर्टजे, रहमानउल्ला गुरबाज
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ
रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली,नुवान, देवदत्त पाडिक्कल, स्वस्तिक छिकारा, लुंगी एनगिडी, अभिनंदन सिंग, मोहित राठी, जोश हेझलवूड, फिल सॉल्ट, जितेश लिव्हिंगस्टोन, रसिक दार, सुयश शर्मा, क्रुणाल पंडया