क्रिकेट

Ishan Kishan RR Vs SRH IPL2025 : छोटा पॅकेट बडा धमाका! ईशान किशनने धुवाधार फलंदाजीसह राजस्थानला तोडलं

आयपीएल 2025 मध्ये ईशान किशनच्या वादळी खेळीने सनरायझर्स हैदराबादला राजस्थान रॉयल्सवर 44 धावांनी विजय मिळवून दिला. किशनने 45 बॉलमध्ये शतक पूर्ण करत 106 धावांची नाबाद खेळी केली.

Published by : Prachi Nate

आयपीएल 2025 च्या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. आज सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा सामना पाहायला मिळाला, ज्यात इशान किशन, अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांच्या वादळी सुरूवातीपासून हैदराबादचं रौद्ररूप पाहायला मिळालं. राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

सनरायझर्स हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी स्विकारत सनरायझर्स हैदराबाद संघाला 286 धावांचं आव्हान देत आयपीएलच्या इतिहासातील दुसरी सर्वात मोठी धावसंख्या केली आहे. या सामन्यादरम्यान सनरायझर्स हैदराबादने 44 अधिक धावांसह राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. यादरम्यान मुंबईच्या ईशान किशनचा हैदराबादच्या संघात वादळी खेळी पाहायला मिळाली.

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या इशान किशनने शतकी खेळी खेळत नाबाद परतला. सुरुवातीलाच अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेडच्या झंझावाती फलंदाजीने राजस्थान रॉयल्स संघाची डोकेदुखी वाढवली. यानंतर ईशान किशन मैदानात आला आणि त्याने दाखवून दिलं की, संघात तो तगडा खेळाडू आहे.

त्याने 45 बॉलमध्ये आपले शतक पूर्ण केले. तसेच त्याने 47 बॉलमध्ये 1 1 चौकारांसह 6 षटकार मारले आणि 106 धावांची क्लास खेळी खेळत राजस्थानला धु-धु धतलं. ईशान किशनच्या तोडक खेळीने राजस्थानला पळता भुई थोडी केली. सनरायझर्स हैदराबादसाठी पदार्पणातच त्याने पहिलं शतक झळकावलं.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष

Mumbai Rain Updates : मुंबईमध्ये पावसाचा कहर ; अनेक ठिकाणी साचलं पाणी

Shubhanshu Shukla : शुभांशू शुक्ला अखेर पृथ्वीवर परतले ; भारताची मान गर्वाने उंचावली

Dahisar : एकसर भूखंड प्रकरण ; महापालिकेचा 349 कोटींचा भूखंड अद्यापही विकासाच्या प्रतीक्षेत