गुरुवारी मुंबई इंडियन्सने (MI) सनरायझर्स हैदराबादवर (SRH) विजय मिळवला. सामान्यात प्रथम फलंदाजी करताना हैदराबाद संघाला फक्त 162 धावा करता आल्या. मुंबईने 19 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर हा सामना जिंकला. या सामान्यात इशान किशनची कामगिरी खराब होती. सामान्यानंतर इशान थोडा नाराज दिसत होता, पण मुंबई इंडियन्सच्या नीता अंबानी त्याला पाठिंबा देताना दिसल्या.
इशानला हार्दिकने मारली मिठी
इशान किशन 7 हंगामापर्यत MI मध्ये खेळत होता. यानंतर हैदराबादने त्याला मोठ्या रकमेला विकत घेतले. वानखेडे स्डेडियमवर विरोधी संघाचा खेळाडू म्हणून इशान खेळण्याची पाहिलीच वेळ होती. सामान्यामध्ये इशानची फलंदाजी चांगली नव्हती. तो फक्त 2 धावा करुन बाद झाला. यानंतर इशान किशन नाराज दिसला.
इशानने नीता अंबानींना नमस्कार केला.
सामना संपल्यानंतर, खेळाडू हस्तांदोलन करत आपल्याला संघाकडे जात होते. मग इशान किशन नीता अंबानींकडे गेला आणि हसत हसत त्याचे स्वागत केले. नीता अंबानी यांनीही ईशानला प्रेमाने प्रतिसाद दिला आणि त्याच्या गालावर प्रेमाने हात फिरवला. इशान नीता अंबानीशी बोला आणि नंतर परत संघाकडे परतला.