क्रिकेट

GT Vs DC IPL2025 Ishant Sharma : उन्हामुळे वैतागला इशांत शर्मा! चेहरा थकला, डोक्यावर भिजलेला टॉवेल, सामन्यातील 'तो' फोटो होतोय व्हायरल

IPL 2025 इशांत शर्मा: वाढत्या उन्हाच्या तापमानामुळे इशांत शर्मा, अक्षर पटेल आणि प्रसिद्ध कृष्णा यांना त्रास झाल्याचे दिसून आले.

Published by : Prachi Nate

गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या संघांमध्ये रंगत पाहायला मिळत आहे. गुजरातने प्रथम नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान प्रथम फलंदाजी दिल्लीने गुजरातला 204 धावांच आव्हन दिलं. यावेळी गुजरातच्या गोलंदाजांमध्ये प्रसिद्ध कृष्णाने दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेल, करुण नायर, केएल राहुल आणि विपराज निगम यांना बाद करत सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. त्याचसोबत मोहम्मद सिराज, अरशद खान आणि इशांत शर्मा या तिघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतल्या आहेत. मात्र, या सामन्यादरम्यान वाढत्या उन्हाचा खेळाडूंना त्रास होताना दिसला आहे.

सध्या भारतात तापमान 40 डिग्रीच्या आसपास आहे. या उष्णतेमुळे खेळाडू चक्क उन्हाने त्रस्त झालेले पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या ओव्हरमध्ये इशांत शर्माने 14 धावा दिल्या. त्यानंतर 14 व्या ओव्हरमध्ये इशांत शर्माला उन्हामुळे डिहायड्रेशनचा त्रास झाल्याचे पाहायला मिळालं. इशांत शर्माला जास्त त्रास झाल्यामुळे तो ब्राऊंड्रीच्या बाहेर जाऊन बसला. यादरम्यान त्याला मोठ्या प्रमाणात डिहायड्रेशन होत असल्यामुळे गुजरात टायटन्सच्या सपोर्ट स्टाफने त्याला पाणी आणि ओला टॉवेल दिला.

तो ओला टॉवेल त्याने डोक्यावर ठेवला असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल आहे. यनंतर काही कालावधीने आराम करुन झाल्यानंतर तो पुन्हा मैदानात उतरला. त्यानंतर 19 व्या ओव्हरमध्ये पुन्हा गोलंदाजीसाठी आलेला इशांत शर्मा दिल्लीच्या आशुतोष शर्मावर भडकलेला पाहायला मिळाला. उन्हामुळे त्रस्त असलेल्या इशांत शर्मा आणि आशुतोष शर्मामध्ये काही वेळेसाठी वाद झाल्याचं पाहायला मिळालं.

त्याच्यासोबत दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेल देखील आशुतोष शर्मासोबत धावा करत असताना त्याच्या पायात क्रॅम्प आल्याचे पाहायला मिळाले. तसेच गुजरातचा गोलंदाज प्रसिद्ध कृष्णालाही क्रॅम्पचा त्रास झाल्याचे पाहायला मिळाले. गुजरात टायनटन्सने या वाढत्या उन्हामुळेच सामन्यापूर्वी चाहत्यांसाठी मोफत पाणी, ओआरएस आणि सनस्क्रिन देणार असल्याची घोषणा केली होती. याबद्दल त्यांचे कौतुकही करण्यात आले होते.

गुजरात टायटन्सची प्लेईंग 11

साई सुधारसन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, अर्शद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, प्रसीध कृष्णा, मोहम्मद सिराज, इशांत शर्मा

दिल्ली कॅपिटल्सची प्लेईंग 11

अक्षर पटेल (कर्णधार), अभिषेक पोरेल, करुण नायर, केएल राहुल, ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा, मुकेश कुमार

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Gautam Adani : सेबीच्या क्लीन चिटनंतर अदानी समूहाला मोठा दिलासा; गौतम अदानी म्हणाले की,...

Mohammed Nizamuddin : अमेरिकन पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका भारतीय तरुणाचा मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

Earthquake : रशियातील कामचटका येथे 7.8 तीव्रतेचा भूकंप; आता त्सुनामीचा इशारा

Latest Marathi News Update live : मुंबई हायकोर्टाला बॉम्बने उडवण्याची धमकी