सप्टेंबर 2025 मध्ये होणाऱ्या आशिया कपसाठी भारतीय संघाच्या कर्णधाराची घोषणा बीसीसीआयने केली आहे. शुभमन गिल की सूर्यकुमार यादव या चर्चेला पूर्णविराम देत बीसीसीआयने सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपदाची धुरा सोपवली आहे.
भारताचा टी-20 कर्णधार असलेला सूर्यकुमार अलीकडे पूर्ण तंदुरुस्त नसल्याने कर्णधारपदावर अनिश्चितता होती. मात्र, तो आता फिट झाला असून नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये सराव सुरू केला आहे. आशिया कप 9 ते 28 सप्टेंबरदरम्यान यूएईमध्ये खेळवला जाणार आहे.
बीसीसीआय 19 किंवा 20 ऑगस्ट रोजी आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा करणार आहे. गेल्या एक वर्षात टी-20 मध्ये सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवरच व्यवस्थापनाचा विश्वास असण्याची शक्यता आहे. बीसीसीआय सूत्रांनुसार, शुभमन गिललाही भविष्यात कर्णधारपदाची संधी मिळेल आणि 2026 च्या टी-20 विश्वचषकानंतर तो टी-20 संघाचे नेतृत्व करू शकतो.
संभाव्य 15 सदस्यीय भारतीय संघ
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, अक्षर पटेल (उपकर्णधार), तिलक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह.