दुबईमध्ये झालेल्या आशिया कप 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यादरम्यान पाकिस्तानची चांगलीच जिरलेली पाहायला मिळाली. या सामन्यात टीम इंडियाने 5 गडी राखून पाकिस्तानच्या खेळाडूंना पळताभूई केलं. यादरम्यान टीम इंडियाचा भेदक गोलंदाज जसप्रीत बुमराहने केलेलं सेलिब्रेशन जोरदार चर्चेत आलं आहे.
भारताला सुपर-4 सामन्यात डिवचणाऱ्या हारिस रऊफला बुमराहने त्याच्याच कृतीतून चोख उत्तर दिलं आहे. सुपर-4 सामन्यात हारिस रऊफने प्लेन क्रॅशची कृती करत भारताच्या जखमेवर मीठ चोळलं होत. हीच गोष्ट चाहत्यांच्या देखील मनाला खात चालली होती. याचा बदला घेत बुमराहने त्यालाच क्लीन बोल्ड करत त्याच्याच भाषेतून त्याला चोख उत्तर दिलं आहे.
सामना सुरु होण्यापूर्वी नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी पाकिस्तानची सुरुवात सावध पाहायला मिळाली. पाकिस्तानने पावर प्लेमध्ये एकही विकेट दिली नाही, मात्र साहिबजादा फरहान बाद झाल्यानंतर पाकिस्तानचा संघ पुर्णपणे ढासळला. बुमराहने डेथ ओव्हरमध्ये भेदक मारा करत पाकिस्तानचा नववा गडी ताफ्यात परत पाठवला.
बुमराहने हरिस रौफला क्लीन बोल्ड करत त्याचा त्रिफळा उडवला आणि त्यानंतर रौफने केलेल्या नापाक कृतीचे उत्तर त्याच्याच भाषेत बुमराहने त्याला दिलं. यावेळी बुमराहने अवघ्या 4 चेंडूत 6 धावांसह रौफला माघारी परतवला. भारतासाठी रौफची विकेट खास होती कारण यामुळे त्याचा माज उतरलेला पाहायला मिळाला.