क्रिकेट

Washington Sundar Wicket, MI vs GT IPL2025: मुंबई इंडियन्सच्या 'मिस्टर यॉर्कर'चा कहर! गुजरात टायटन्सला कळू ही दिल नाही अन् घेतली विकेट

MI vs GT सामन्यादरम्यान जसप्रीत बुमराहाने वॉशिंग्टन सुंदरची यॉर्कर स्टाईलने विकेट घेतली

Published by : Prachi Nate

पंजाबच्या मैदानावर पार पडलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा दारुण पराभव केला. यावेळी साई सुदर्शन व वॉशिंग्टन सुंदर मैदानावर असेपर्यंत गुजरातला विजयाच्या आशा होत्या. मात्र मुंबई इंडियन्सकडून कर्णधार हार्दिक पांड्याने हुकमी एक्का मिस्टर यॉर्करला बाहेर काढले, आणि गुजरात संघ पंजाबच्या मैदानात माघारी फिरला. गुजरातचा कर्णधार अवघ्या 1 धावेवर माघारी फिरल्याबरोबर साई सुदर्शनने आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी गुजरातचं पारड सांभाळलं होत. साई सुदर्शनने 50 बॉलमध्ये 80 धावा केल्या तर वॉशिंग्टन सुंदर 24 बॉलमध्ये 48 धावा केल्या. यावेळेस सुदर्शन व सुंदर यांनी 44 चेंडूंत 84 धावांची भागीदारी केली. त्यावेळेस गुजरात विजयाच्या दिशेने जात होता.

मात्र जसप्रीत बुमराहा मैदानात उतरला आणि त्याच्या यॉर्कर स्टाईलने वॉशिंग्टन सुंदरची विकेट घेतली अन् गुजरातचा धुरळा उडाला. जसप्रीत बुमराहचा यॉर्कर एवढा जोरदार होता की, काही न कळू देताना बॉल हा वॉशिंग्टन सुंदरच्या पायांच्या मधून गेला आणि थेट स्टम्पवर आदळला. यावेळी जसप्रीत बुमराहला 4 ओव्हरमध्ये 27 धावा देत गुजरातची महत्त्वाची विकेट घेतली. दरम्यान या सामन्यात गुजरातकडून प्रसिद्ध कृष्णाने 2 विकेट घेत 4 ओव्हरमध्ये 53 धावा दिल्या. साई किशोर याने देखील दोन विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराजने 1 विकेट घेतली. गेराल्ड कोएत्झीने 3 ओव्हरमध्ये 51 धावा दिल्या.

तर मुंबईकडून रोहित शर्माने 50 बॉलमध्ये 9 चौकार आणि 4 षटकार मारत 81 धावांची खेळी खेळली आणि गुजरातला धु-धु धुतला आहे. तर जॉनी बेअरस्टोने 22 बॉलमध्ये 47 धावांची शानदार फंदाजी केली. सुर्यकुमार यादवने 20 बॉलमध्ये 33 धावा करत रोहित शर्माला चांगली साथ दिली. यासोबत मुंबई इंडियन्स क्वालिफाय 2 मध्ये पंजाब किंग्ससमोर आमने सामने येणार आहे. त्यामुळे क्वालिफाय 2 मध्ये रंगाणारा हा सामना फायनलमध्ये धडक मारण्याासठी दोन्ही संघांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा