क्रिकेट

Jasprit Bumrah : "आमचा मुलगा मनोरंजनासाठी नाही", लेकाला ट्रोल करणाऱ्यांना बुमराहच्या बायकोनं सुनावले खडेबोल

MI vs LSG IPL 2025 सामन्यादरम्यान जसप्रीत बुमराहचा मुलगा अंगद याला ट्रोल करण्यात आलं यावर बुमराहची पत्नी संजना गणेशनने इंस्टाग्रामवर स्टोरी टाकत प्रतिक्रिया दिली आहे

Published by : Prachi Nate

काल मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. यादरम्यान काल या सामन्याला जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन आणि मुलगा अंगद यांनी देखील हजेरी लावली होती. यादरम्यान जसप्रीत बुमराहचा मुलगा अंगद हा कॅमेरामध्ये कैद झाला. ज्यामुळे त्याच्या चर्चा होऊ लागल्या. या चर्चांना कंटाळून संजनाने इंस्टाग्राम स्टोरी ठेवत अंगदला ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सला खडेबोल सुनावले आहेत. याचस्टोरीला बुमराहने देखील मेन्शन बॅक दिलं आहे.

दरम्यान संजना म्हणाले की, "आमचा मुलगा तुमच्या मनोरंजनासाठी विषय नाही. जसप्रीत आणि मी अंगदला सोशल मीडियापासून दूर ठेवण्यासाठी आमच्या शक्तीने सर्वतोपरी प्रयत्न करतो कारण इंटरनेट हे एक घृणास्पद, घृणास्पद ठिकाण आहे आणि कॅमेऱ्यांनी भरलेल्या क्रिकेट स्टेडियममध्ये मुलाला आणण्याचे परिणाम मला पूर्णपणे समजतात, परंतु कृपया हे समजून घ्या की अंगद आणि मी जसप्रीतला पाठिंबा देण्यासाठी तिथे होतो आणि दुसरे काहीही नाही".

"आमचा मुलगा व्हायरल इंटरनेट कंटेंट किंवा राष्ट्रीय बातम्यांमध्ये सहभागी होण्यात आम्हाला रस नाही, जिथे अनावश्यक मतप्रणाली असलेले कीबोर्ड योद्धे ३ सेकंदांच्या फुटेजवरून अंगद कोण आहे, त्याची समस्या काय आहे, त्याचे व्यक्तिमत्व काय आहे हे ठरवत असतात. तो दीड वर्षांचा आहे".

"बाळाच्या संदर्भात आघात आणि नैराश्यासारखे शब्द फेकणे हे आपण एक समुदाय म्हणून कोण बनत आहोत याबद्दल बरेच काही सांगते आणि ते खरोखरच खूप दुःखद आहे. तुम्हाला आमच्या मुलाबद्दल काहीही माहिती नाही, आमच्या आयुष्याबद्दल काहीही माहिती नाही आणि मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही तुमचे मत ऑनलाइन खरे ठेवा. आजच्या जगात थोडीशी प्रामाणिकता आणि थोडीशी दयाळूपणा खूप पुढे जाऊ शकते".

काल झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स या सामन्यात जसप्रीत बुमराहने तब्बल 4 विकेट्स घेतल्या त्याने मिलरला, अब्दुल समदला, आवेश खानला यांसरख्या खेळाडूंच्या विकेट्स घेतल्या. त्यामुळे बुमराहची या सामन्यादरम्यान कमालीची कामगिरी पाहायला मिळाली आहे. या सामन्यामध्ये मुंबईने 54 धावांसह लखनऊवर मात केली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Meenatai Thackeray Statue : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Latest Marathi News Update live : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींनी घाईघाईने निर्णय घेऊ नका, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Kiran Kale Shivsena UBT : ठाकरेंच्या शिवसेनेच्या किरण काळेंवर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?