क्रिकेट

Jemimah Rodrigues IND vs AUS : जेमिमा रॉड्रिग्जच्या आयुष्यातील ते 5 जण कोण? ज्यांनी तिचं आयुष्य बदललं

भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज हिने 30 ऑक्टोबरच्या संध्याकाळी नवी मुंबईच्या मैदानावर खेळलेली शतकी खेळी म्हणजे एक इतिहासच रचला. यादरम्यान जेमिमा रॉड्रिग्जच्या आयुष्यातील “त्या पाच जिवलगांची” गोष्ट सांगितली आहे.

Published by : Prachi Nate

भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज हिने 30 ऑक्टोबरच्या संध्याकाळी नवी मुंबईच्या मैदानावर खेळलेली शतकी खेळी म्हणजे एक इतिहासच रचला. 339 धावांचं वर्ल्ड रेकॉर्ड लक्ष्य चेस करताना तिच्या बॅटमधून झरलेले फटके फक्त भारताला फाइनलमध्ये पोहोचवणारे नव्हते, तर त्या फटक्यांमागे एका मुलीचा लढा, तिची वेदना आणि तिच्या आयुष्यातील काही माणसांची अबोल शक्ती दडली होती.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यानंतर प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलताना जेमिमा भावनिक झाली. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते दुःखाचे नव्हते,ते तिच्या पुनरागमनाचे, तिच्या संघर्षावर विजय मिळवल्याचे होते. तिने सांगितले की, तिच्या आयुष्यातील एका काळात ती पूर्णपणे तुटली होती. 2022 मध्ये जेव्हा तिला वनडे वर्ल्डकपसाठी भारतीय संघातून वगळण्यात आले, तेव्हा ती चिंता आणि नैराश्याच्या गर्तेत सापडली. “मी दिवसेंदिवस रडत असे, स्वतःवरचा विश्वास हरवत होते,” ती म्हणाली.

पण त्या काळात काही लोकांनी तिचा हात धरला आणि तोच हात तिच्या पुनर्जन्माचा आधार ठरला. जेमिमाने सांगितले की, तिच्या आई-वडिलांनी त्या संकटकाळात तिच्यासाठी देवासारखी भूमिका निभावली. “मम्मी-पप्पांनी मला हार मानू दिली नाही. त्यांनी मला आठवण करून दिली की माझं मूल्य फक्त रनमध्ये नाही, तर माझ्या प्रयत्नांमध्ये आहे,” असं ती म्हणाली.

तिच्या आयुष्यातील उरलेल्या तीन व्यक्ती होत्या तिच्याच संघातील सहकारी अरुंधती रेड्डी, स्मृती मंधाना आणि राधा यादव. अरुंधतीने तिच्या भावनिक अवस्थेत तिचं मनोबल उंचावलं, तर स्मृती मंधानाने तिची क्रिकेटमधील साथीदार म्हणून नव्हे तर मैत्रीण म्हणून साथ दिली. “स्मृतीनं मला पुन्हा नेट्समध्ये नेलं, पुन्हा बॅट हातात घ्यायला लावलं. तिच्यामुळे मी स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवू शकले,” ती म्हणाली. राधा यादवबद्दल बोलताना ती हसत म्हणाली, “राधा नेहमी मला हसवत राहिली. काही वेळा एक छोटं हसूही औषध ठरतं.”

या सर्वांच्या साथीनं जेमिमा पुन्हा उभी राहिली. मैदानावर परतताना तिच्या डोळ्यांत आत्मविश्वास होता आणि मनात कृतज्ञता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात तिने जेव्हा शतक झळकावलं, तेव्हा तिच्या मनात केवळ विजयाचा आनंद नव्हता, तर त्या सर्वांचा चेहरा झळकत होता ज्यांनी तिचं आयुष्य पुन्हा रंगवलं. आज जेमिमा रॉड्रिग्ज फक्त भारतीय क्रिकेटची नायिका नाही, तर ती लाखो तरुणांसाठी प्रेरणास्थान बनली आहे. तिची कहाणी सांगते, संघर्ष कोणालाही थांबवू शकत नाही, जर योग्य माणसं आपल्या सोबत असतील.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा