काल लखनऊ येथील इकाना स्टेडियमवर पार पडलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स या सामन्यात आरसीबीने 6 गडी राखून 230 धावांचा पाठलाग करत लखनऊ विरुद्ध दणदणीत विजय मिळवला. त्याचसोबत आरसीबीने क्वालिफायचे तिकीट देखील पटकावले आहे. त्यामुळे पंजाब आणि बंगळुरू हे संघ क्वालिफाय 1 च्या तिकीटचे मानकरी ठरले आहेत.
लखनऊ विरुद्धच्या सामन्यात रजत पाटीदार दुखापतीतून पुर्णपणे सावरला नसल्यामुळे जितेश शर्माने संघाची जबाबदारी सावरली. यावेळी जितेश शर्माने अवघ्या 33 चेंडूंमध्ये 85 धावांसह आरसीबीच्या विजयासाठी एकतर्फी खेळला. या धावा करत असताना त्याने 8 चौकार आणि 6 षटकार लगावले. तर विराट कोहलीने 30 चेंडूंमध्ये 54 धावा करत सुरुवातीला नियंत्रण ठेवले. याचसोबत आरसीबीने जबरदस्त विजय मिळवला.
याचपार्श्वभूमीवर विराटने टी20 क्रिकेटमध्ये विश्वविक्रम करत इतिहास घडवला आहे. विराट कोहलीला टी20 क्रिकेटचा रनमशीन असं म्हटलं जातं, विराटने अनेक विक्रम स्वतःच्या नावावर केले आहेत. लखनऊ विरुद्ध सामना खेळताना विराटने 9000 धावा पूर्ण करण्याचा पराक्रम आपल्या नावे केला आहे.
टी20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याच खेळाडूला एकाच संघासाठी इतक्या धावा केल्या नाही. त्यामुळे एकाच संघासाठी 9000 धावा करणारा विराट पहिलाच खेळाडू ठरला आहे. त्याचसोबत रोहित शर्माने देखील मुंबई इंडियन्ससाठी 6060 धावांचा विक्रम केला आहे.