क्रिकेट

GT Vs DC IPL 2025 : बटलर पेटून उठला! गुजरातच्या मैदानावर बटलरने दिल्लीला दिला धोबी पछाड

GT vs DC: जोस बटलरने दिल्ली कॅपिटल्सला 5 चौकारांसह 97 धावांनी पराभूत केलं. गुजरात टायटन्सने घरच्या मैदानावर विजय मिळवला.

Published by : Prachi Nate

आज नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या संघांमध्ये चुरस पाहायला मिळाली. यादरम्यान गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तसेच दिल्लीने 203 धावा करत गुजरातला 204 धावांच आव्हन दिलं. यादरम्यान गुजरातच्या गोलंदाजांमध्ये प्रसिद्ध कृष्णाने दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेल, करुण नायर, केएल राहुल आणि विपराज निगम यांना बाद करत सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

त्याचसोबत मोहम्मद सिराज, अरशद खान आणि इशांत शर्मा या तिघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतल्या आहेत. तसेच दिल्लीकडून सुरुवातीला अभिषेक पोरेल आणि करुण नायर या दोघांनी चांगली सुरुवात करुन दिली. अभिषेकने 31 धावा केल्या तर करुणने 31 धावा केल्या. तर केएल राहुलने 28 धावा केल्या. त्याचसोबत कर्णधार अक्षर पटेलने 39 धावा केल्या.

तर दुसरीकडे गुजरातने 204 धावा करत घरच्या मैदानावर धुळ चारली आहे. यावेळी साई सुदर्शन आणि कर्णधार शुभमन गिल हे दोघ मैदानात सुरुवात करण्यासाठी उतरले. मात्र यावेळी साई सुदर्शनने 36धावा केल्या, तर दुसरीकडे कर्णधार शुभमन गिल 7 धावांसह माघारी फिरला. यानंतर जोस बटलर आणि शेरफन रुदरफोर्ड यांनी संघाला सावरलं. बटलर जबरदस्त फॉर्ममध्ये पाहायला मिळाला. बटलरने 97 धावा केल्या तर रुदरफोर्डने 43 धावाच. यावेळी बटलरने एकूण '4,4,4,4,4...' 5 चौकारासह दिल्लीला चारही बाजूंनी घरच्या मैदानावर लोळवलं आहे.

गुजरात टायटन्सची प्लेईंग 11

साई सुधारसन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, अर्शद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, प्रसीध कृष्णा, मोहम्मद सिराज, इशांत शर्मा

दिल्ली कॅपिटल्सची प्लेईंग 11

अक्षर पटेल (कर्णधार), अभिषेक पोरेल, करुण नायर, केएल राहुल, ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा, मुकेश कुमार

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Meenatai Thackeray Statue : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Latest Marathi News Update live : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींनी घाईघाईने निर्णय घेऊ नका, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Kiran Kale Shivsena UBT : ठाकरेंच्या शिवसेनेच्या किरण काळेंवर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?