क्रिकेट

Kagiso Rabada IPL 2025 : रबाडा ड्रग्स प्रकरणामुळे अडचणीत, तरीही खेळणार Mumbai Indians विरुद्ध सामना

कागिसो रबाडा ड्रग्स प्रकरणामुळे अडचणीत आल्यानंतर आता मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स आयपीएल सामना खेळणार.

Published by : Prachi Nate

देशभरात सध्या आयपीएलचे वारे वाहत आहेत. असं असतानाच सुरुवातीलाच गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा ड्रग्स प्रकरणामुळे अडचणीत आल्याचं समोर आला. यामुळे त्याला दक्षिण आफ्रिकेला आपल्या मायदेशी परतावे लागले. यादरम्यान रबाडा प्रतिक्रिया देत म्हणाला होता की, ड्रग्सच्या सेवन प्रकरणात दोषी असल्यामुळे त्याच्यावर आयपीएलचे सामने खेळण्यासाठी बंदी घालण्यात आली होती.

"उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्यानंतरची प्रक्रिया रबाडाने पूर्ण केली असून तो आयपीएलमध्ये खेळू शकतो", असे दक्षिण आफ्रिका इन्स्टिट्यूट फॉर ड्रग फ्री स्पोर्ट्सने सोमवारी जाहीर केले. त्यामुळे रबाडा भारतात परतला असून तो गुजरात संघात प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे तो आज मुंबईच्या वानखेडे स्टेडिअममध्ये होणाऱ्या गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स या सामन्यात गुजरात संघाकडून पदार्पण करणार आहे.

तसेच गुजरात टायटन्स संघाचे संचालक विक्रम सोळंकी यांनी यापार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देत सांगितलं की, "रबाडाने त्याच्यावर टाकलेल्या बंदीचा कालावधी पुर्ण केला आहे. त्यामुळे तो गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स या सामन्यात उपस्थित राहणार आहे". त्यामुळे रबाडाचे पुनरागमन या दोन्ही संघांसाठी महत्त्वाचे आहे. तसेच आतापर्यंत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 सामन्यात रबाडाने 47 विकेट्स घेतल्या आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : जालन्यात बंजारा समाजाचा मोर्चा

Satara News : आश्चर्यचकित! साताऱ्यातील एका मातेने दिला ७ मुलांना जन्म, नेमकं प्रकरण काय?

Beed Heavy Rain : बीडमध्ये पावसाचा कहर; अनेक गावांचा संपर्क तुटला

Income Tax Return Filing : ITR भरण्याचा आज शेवटचा दिवस; अंतिम तारीख चुकल्यास...